प्रधान मंत्री पीक विमा योजना,2020-2022 नुकसान भरपाई साठी 11 कोटीचा निधी मंजूर, या दिवशी मिळणार विमा ? पिक विमा यादी पहा? Pik Vima

Pik Vima शेतकऱ्यांना आता खूपच आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पिक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत. हा पिक विमा 2020-2022 वर्षी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी वाटल्या जाणार आहे. यामध्ये जवळजवळ 10664.94 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जमा करण्यात येईल. तर चला पाहूया या प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा पिक विमा भेटणार आहे.

Pik Vima- पिक विमा

शेतकरी मित्रांनो काही वर्षा अगोदर राज्य शासनाने आता पीक विमा काढा फक्त एक रुपयात ही योजना सुरू केली होती म्हणजे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान झाल्यास राज्य शासन त्याची नुकसान भरपाई करून देईल. तर राज्यामध्ये 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निधी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याद्वारे 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

प्रधान मंत्री पीक विमा योजना
प्रधान मंत्री पीक विमा योजना

या जीआर मध्ये स्पष्ट लिहिले आहे की 2020 ते 2022 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे पावसामुळे जे काही नुकसान झाले होते त्यांना नुकसान भरपाई साठी एकूण 10664.94 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

पिक विमा यादी पहा

कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार?

  • नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानी करिता मदत ते 30 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त झालेल्या त्या त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विहित मर्यादित अनुदे राहील
  • प्रचलित पद्धतीने नुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनामेनुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरिता तहसीलदारांना त्यांनी विहित नमुन्यात संगणकीय प्रणालीवर तातडीने माहिती भरावी
  • बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल
  • कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा अभिष्टा स्वरूपात मदत देऊ नये

हे पण वाचा

1 thought on “प्रधान मंत्री पीक विमा योजना,2020-2022 नुकसान भरपाई साठी 11 कोटीचा निधी मंजूर, या दिवशी मिळणार विमा ? पिक विमा यादी पहा? Pik Vima”

Leave a comment