Pik Vima 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार आहे? तर मित्रांनो राज्यामध्ये जवळपास 35 लाख असे शेतकरी आहेत ज्यांना पिक विमा वाटप होणार आहे. यासाठी शासनाने 2000 हजार कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहे. यासाठी शासनाने 11 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत पिक विमा शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करावा असे आदेश पीक विमा कंपन्यांना दिली आहेत. यंदा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता त्यासोबतच दिवाळीनंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून एक रुपयाचा पिक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. परिणामी नोव्हेंबर महिन्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू आहे. चला मग त्याबद्दल सर्व काही माहिती घेऊया.
पिक विमा 2024 – Crop Insurance 2024
या लेखामध्ये आपण बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांना किती रुपये वाटप झाले आहेत याबद्दल माहिती दिली आहे आणि त्यासोबत उर्वरित 14 जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर आहे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत ही सुद्धा चर्चा केली आहे.
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra
शेतकरी मित्रांनो 2023 मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांची वितरण करण्यात आले होते, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पडताळणी झाली नाही त्यामुळे त्यांना पिक विमा भेटलाच नाही. अशा शेतकऱ्यांची फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 76 कोटी 27 लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यास सुरू केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना विमा आगरीन जमा झाल्याचे एसएमएस सुद्धा पाठवले गेले आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.14/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today
तालुका | अग्रीम रक्कम | शेतकरी |
आंबेजोगाई | 12 कोटी 26 लाख | 12391 |
आष्टी | 1 कोटी 49 लाख | 2535 |
बीड | 5 कोटी 22 लाख | 7171 |
धारूर | 3 कोटी 86 लाख | 3541 |
गेवराई | ३ कोटी ४४ लाख | 5446 |
केज | 13 कोटी 7 लाख | 19125 |
माजलगाव | 14 कोटी 13 लाख | 19027 |
परळी | 16 कोटी 57 लाख | 25155 |
पाटोदा | 3 कोटी 90 लाख | 8877 |
शिरुरी | 62 लाख 85 हजार | 2932 |
वडवणी | 1 कोटी 47 लाख | 5401 |
पिक विमा 2023 कधी मिळणार? (यादी पहा)
राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटपास सुरू झालेली आहे हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अकरा मार्चपासून 31 मार्च पर्यंत जमा होणार आहे याची आदेश शासनाने पिक विमा कंपन्यांना दिली आहेत आणि जीआर सुद्धा जाहीर केला आहे यामध्ये तब्बल 14 जिल्हे असून 14 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यांना स्वतंत्र निधी घोषित केला आहे त्याची सर्व यादी आपण खाली पाहू शकता.
पात्र जिल्हे | मंजूर रक्कम |
अमरावती | 8 लाख |
लातूर | 244 कोटी 87 लाख |
नागपूर | 52 कोटी 21 लाख |
परभणी | 206 कोटी 11 लाख |
जालना | 160 कोटी 48 लाख |
कोल्हापूर | 13 लाख |
अकोला | 97 कोटी 29 लाख |
धाराशिव | 218 कोटी 85 लाख |
बुलढाणा | 18 कोटी 39 लाख |
बीड | 241 कोटी 41 लाख |
सांगली | 22 कोटी 4 लाख |
सातारा | 6 कोटी 74 लाख |
सोलापूर | 111 कोटी 41 लाख |
अहमदनगर | 160 कोटी 28 लाख |
1 thought on “पिक विमा 2024, पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024”