Pik Vima 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन शासन जीआर मध्ये. शेतकरी मित्रांनो शासनाने उर्वरित 75 टक्के पिक विमा मंजूर केला आहे आणि हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 11 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत जमा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिक विमा जमा झालेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा पिक विमा कधी मिळणार? असे काही प्रश्न शेतकऱ्यांना आहेत. शेतकरी मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आधीसूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होत आहे. यामध्ये बरेच शेतकरी पिक विमा 2024 पासून वंचित राहत आहेत, तर याचे कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना कसा हा पिक विमा मिळेल याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो 75 टक्के पीक विम्यामध्ये तुम्हाला सोयाबीन, कापूस, मका या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये पर्यंत अनुदान शासनाद्वारे देण्यात येणार आहे. तर चला मग याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
75 टक्के पिक विमा 2024– 75% crop insurance 2024
मित्रांनो 75 टक्के पिक विमासाठी शासनाने जवळपास 2000 हजार कोटी एवढा निधी मंजूर केला आहे. या 75 टक्के पीक विमासाठी तब्बल 35 लाख शेतकरी पात्र आहेत. ज्याची माहिती खाली टेबल मध्ये दिली आहे. ते तुम्ही वाचून घेऊ शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपयांची मंजूर रक्कम झाली आहे हे तुम्ही पाहू शकता.
Sr.No | पात्र जिल्हे | मंजूर रक्कम | लाभार्थी शेतकरी |
1) | अमरावती | 8 लाख | 10,256 |
2) | लातूर | 244 कोटी 87 लाख | 2,19,535 |
3) | नागपूर | 52 कोटी 21 लाख | 63,422 |
4) | परभणी | 206 कोटी 11 लाख | 4,41,970 |
5) | जालना | 160 कोटी 48 लाख | 3,70,625 |
6) | कोल्हापूर | 13 लाख | 228 |
7) | अकोला | 97 कोटी 29 लाख | 1,77,253 |
8) | धाराशिव | 218 कोटी 85 लाख | 4,98,720 |
9) | बुलढाणा | 18 कोटी 39 लाख | 36,358 |
10) | बीड | 241 कोटी 41 लाख | 7,70,574 |
11) | सांगली | 22 कोटी 4 लाख | 98,372 |
12) | सातारा | 6 कोटी 74 लाख | 40,406 |
13) | सोलापूर | 111 कोटी 41 लाख | 1,82,534 |
14) | अहमदनगर | 160 कोटी 28 लाख | 2,31,831 |
पिक विमा 2024– Pik Vima 2024
शेतकरी मित्रांनो यंदा झालेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर जून आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडला. त्यानंतर 50% पेक्षाही जास्त पिकांचे उत्पन्न जागेवरच घटले. अशी काही झटके शेतकऱ्यांना मिळू लागली. शेतकऱ्यांना कळून चुकले की यंदा आपल्याला चांगले उत्पन्न होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा काढून घेतलेला होता. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यांमध्ये तब्बल 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी पिक विमा जाहीर केला. त्यानंतर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना 25% पीक विम्याची वाटप झाले त्यामध्ये 1700 कोटी एवढा निधी मंजूर होता. त्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये ते 24 हजार रुपये मिळाली. आता शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 11 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत जमा होणार आहे याबद्दल शासनाने एक जीआर जाहीर केला आहे.
2 thoughts on “पिक विमा 2024, 75% पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024”