Pik Vima 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं! शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे आणि अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विम्यासाठी आपली नोंद दर्शवली होती. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या पिक विमा मिळत आहे. तर बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू करण्यात आली आहे. अशी बातमी राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो बीड येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये 241 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल होत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळत आहे, तर मग चला त्या शेतकऱ्यांची यादी पाहूया आणि त्यासोबतच बीड मधील कोणत्या कोणत्या तालुक्यांना हा पिक विमा भेटला आहे याची सुद्धा यादी पाहूया.
पिक विमा कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील पिक विम्याची वाटप सुरू झालेली आहे. जवळपास 11 तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेली आहे. यामध्ये आम्ही खालच्या टेबल मध्ये सर्व तालुक्यांची लिस्ट दिली आहे. ज्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत? त्यासोबतच तालुक्याला एकूण किती निधी मिळाला आहे? हे सुद्धा आपण सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 61 शेतकऱ्यांना जवळपास 76 कोटी रुपयांची वाटप करण्यात येत आहे. अशी बातमी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरती दिली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra
Sr.No | तालुका | अग्रीम रक्कम | शेतकरी |
1. | आंबेजोगाई | 12 कोटी 26 लाख | 12391 |
2. | आष्टी | 1 कोटी 49 लाख | 2535 |
3. | बीड | 5 कोटी 22 लाख | 7171 |
4. | धारूर | 3 कोटी 86 लाख | 3541 |
5. | गेवराई | ३ कोटी ४४ लाख | 5446 |
6. | केज | 13 कोटी 7 लाख | 19125 |
7. | माजलगाव | 14 कोटी 13 लाख | 19027 |
8. | परळी | 16 कोटी 57 लाख | 25155 |
9. | पाटोदा | 3 कोटी 90 लाख | 8877 |
10. | शिरुरी | 62 लाख 85 हजार | 2932 |
11. | वडवणी | 1 कोटी 47 लाख | 5401 |
पिक विमा 2023 – Crop Insurance 2023
शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केल्या आणि त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त पिकांची उत्पन्न घटले आणि याच कारणामुळे बीड जिल्ह्यामध्ये 7 लाख 70 हजार एवढे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले. ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा काढला होता अशी शेतकरी या पिक विमा साठी पात्र करण्यात आले. या जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये जवळपास 241 कोटीचे पहिल्या टप्प्याचे वाटप करण्यात आले. या पहिल्या टप्प्यांमध्ये जवळपास 1 लाख 11 हजार 601 शेतकरी अपात्र ठरण्यात आले होते. कारण या शेतकऱ्यांनी वेळोवेळी ई-केवायसी आणि ई-पीक पाहणी केली नव्हती. यामुळे असे शेतकरी अपात्र करण्यात आले. आता या 01 लाख 11 हजार 671 दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आले असून या शेतकऱ्यांना 76 कोटी 27 लाख एवढा निधी वाटप करण्यात येणार आहे.
1 thought on “पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023”