Pik Vima 2023: 75% पिक विमा कधी मिळणार हे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते. तर शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाने एक नवीन जीआर सादर केला आहे. यामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जवळपास 2086 कोटी 54 लाख रुपयाचा अग्रीम पीक विमा मंजूर झालेला आहे. हा पिक विमा जवळपास 49 लाख 5 हजार 32 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर(DBT) द्वारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने जिल्ह्याकडे जिल्ह्यांनी तालुक्याकडे, तालुक्याने महसूल मंडळाकडे त्यानंतर महसूल मंडळाने ग्रामसेवकाकडे केवायसी च्या याद्या पाठवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ग्रामसेवकाकडे जाऊन केवायसी करून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांना यामध्ये तुम्हाला तीन हेक्टर पर्यंत सरसकट मदत जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 27 हजार रुपयाची आर्थिक मदत केल्या जाणार आहे तर मग चला पाहूया दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणते शेतकरी पात्र आहेत याची यादी आपण पाहूया
75% पिक विमा कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये कापूस मका ज्वारी बाजरी सोयाबीन अशा पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यात निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपये मिळणार असल्यास सुद्धा जीआर मध्ये सांगितलेले आहे. हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी लवकर केवायसी(e-kyc) करून घेतली होती अशा शेतकऱ्यांना लवकर हा पिक विमा मिळणार आहे.
पिक विमा 2023
मित्रांनो राज्यामध्ये 1 कोटी 69 लाख 4790 शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी केली होती. यामध्ये जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर केलेला आणि या पिक विमा चा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीमध्ये जमा करण्यामध्ये आल होत्या त्याला आपण 25% अग्रीम पिक विमा असे म्हणतो. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75 टक्के पीक विमा मिळणार असल्याची माहिती जीआर द्वारे मिळाली आहे. तर चला मग पाहूया दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोणते पात्र जिल्हे आहेत.
जिल्ह्यातील संख्या | दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे |
1. | जालना |
2. | परभणी |
3. | नागपूर |
4. | लातूर |
5. | अमरावती |
6. | नांदेड |
7. | अहमदनगर |
8. | सोलापूर |
9. | बीड |
10. | अकोला |
11. | धाराशिव |
12. | सांगली |
13. | सातारा |
14. | जळगाव |
15. | नाशिक |
2 thoughts on “पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार?, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023”