Dushkal Yadi 2023 परभणीकरांना नमस्कार, मित्रांनो परभणीतील जवळपास 13 महसूल मंडळी खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळासाठी पात्र ठरलेले आहेत. यासाठी शासनाने जवळपास 205 कोटी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. परभणीकरांनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्र मधील तब्बल 16 जिल्ह्यामधील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. ही दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शासनाने या 43 तालुक्याकरिता 2100 कोटी 87 लाख एवढा निधी मंजूर केलेला आहे. दुष्काळामध्ये तब्बल 38 लाख शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे.
मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शासनाने 5 विभागीय जिल्ह्यामध्ये हा दुष्काळ जाहीर केला आहे. ज्यामध्ये जवळपास 43 तालुके पात्र आहेत. तर परभणीकरांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 206 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि यासाठी किती शेतकरी पात्र आहेत? शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती रुपयाचा अनुदान मिळणार आहे? व तसेच पिकानुसार शेतकऱ्यांना किती रुपयाची मदत मिळणार आहे? याबाबत आपण सर्व काही चर्चा करणार आहोत.
दुष्काळ यादी 2023
तर शेतकरी मित्रांनो परभणी मधील जवळपास दुष्काळासाठी तेरा महसूल मंडळी पात्र केलेली आहेत राज्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये सरासरी 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला होता अशा तालुक्यांसाठी 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णय सोबत नमूद केलेल्या परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळापैकी 13 महसूल मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत अशा परभणी जिल्ह्यातील खालील 13 महसूल मंडळामध्ये शासन निर्णयाद्वारे दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे.
शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळसाठी महाराष्ट्रातील 43 तालुके मधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, भुईमूग, कांदा या पिकासाठी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत सरसकट मदत देण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 11 मार्चपासून ते 31 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये जमा होणार आहे.
तालुका | महसूल मंडळी |
परभणी | टाकळी, कुंभकर्ण |
पूर्णा | कावलगाव |
पालम | पेठशिवणी, रावराजुर |
गंगाखेड | पिंपळदरी |
सोनपेठ | शेळगाव, वडगाव |
पाथरी | कासापुरी |
मानवत | रामपुरी, ताडबोरगाव |
जिंतूर | वाघिधानोरा, दुधगाव |
सेलू | मोरगाव |
दुष्काळ यादी 2023, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, यादी पहा, Dushkal Yadi 2023
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.10/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढणार?, Kapus Bajar Bhav Today