Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती भाव भेटला आहे. तर शेतकरी मित्रांनो सध्या कापसाची आवक दिवसेंदिवस बाजारामध्ये कमी होत चाललेली आहे. कारण कापसाचे भाव देखील घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर सर्वोच्च असले पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाला व्यवस्थित भाव भेटत नाहीये. गुजरात मध्ये सुद्धा हेच हाल चालू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सरासरी भाव 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे आणि कापसाला जास्तीत जास्त दर 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय नाराज झालेले आहेत. तर कापसाचा भाव वाढेल का नाही याची सुद्धा अपेक्षा शेतकऱ्यांना होत आहे. तर शेतकरी मित्रांनो पुढच्या एका महिन्यामध्येच कापसाचे बाजारभाव वाढण्याचे पुन्हा कापूस अभ्यासक तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आपला कापूस सध्या विकू नये तर मग चला पाहूया आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर भेटले.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो सध्या तीन दिवस सुट्टी असल्यामुळे बऱ्याच बाजार समित्या बंद आहेत त्यामुळे आम्हाला काल आज आणि उद्या कापसाला किती दर मिळाला आहे याची प्रॉपर माहिती भेटत नाहीये. त्यामुळे आम्ही कशीबशी पाच-दहा बाजार समितीची माहिती काढलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सरासरी 7200 ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तर जास्तीत जास्त कापसाला दर हा 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा भेटत आहे. त्यामुळे सध्या कापूस विकायची गडबड करू नका.
शेतकरी मित्रांनो आज अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. त्यानंतर देऊळगाव राजा येथे कापसाला 7795 रुपये प्रतिक्विंटल एवढा जास्तीत जास्त दर लागला आहे आणि त्यानंतर काटोल बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त 7250 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. त्यानंतर परभणी बाजार समिती येथे सुद्धा कापसाला 7800 रुपये क्विंटल एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढा कापूस विकण्याचा प्रयत्न करू नये
Cotton Rate Today
सध्या महाराष्ट्रातील जवळपास 85% शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 15% ते 10% कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे आहे. तर तर सर्वात जास्त कापसाचा स्टॉक सीसीआय कडे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि बाजारभाव सुद्धा कमी होत चाललेला आहे. तर शेतकरी मित्रांनो पुढच्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा कापसाचे दर वाढणार आहेत. कारण की अमेरिकेतील जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विकलेला आहे. त्यामुळे कापसाची टंचाई भासत आहे. भारतीय कापसाला बाहेर देशांमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. कारण की आपला कापूस स्वस्त असतो. त्यामुळे कापसाचे दर मित्रांना पुन्हा एप्रिल ते मे महिन्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.30/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”