Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत 13 मार्च रोजी कापसाला किती भाव लागला आहे आणि त्यासोबतच आपण चर्चा करणार आहोत की कापसाचे भाव पुढच्या दोन महिन्यांमध्ये कसे राहतील? तर शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या मालाची आवक बाजारामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कारण बऱ्याच कापूस अभ्यासक तज्ञांना अस दिसून आल आहे की सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती कापसाचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि भारतामधील उद्योगांना कापसाची गरज भासत आहे. त्यामुळे कापसाची व्यापाऱ्यांना, उद्योगांना आणि इतर देशांना खूपच गरज आहे. सध्या राज्यामध्ये कापसाला सरासरी दर हा 7500 रुपये क्विंटल ते 7800 रुपये क्विंटल एवढा दर मिळतोय. जास्तीत जास्त दर हा 8100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. 9 मार्च रोजी कापसाला 8250 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रश्न पडतो की कापसाचे भाव पुन्हा कधी वाढतील? तर चला याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया.
आजचे कापसाचे बाजार भाव – Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो आज आपल्यापाशी महाराष्ट्रातील जवळपास दहा ते पंधरा बाजार समितीमधील कापसाचे दर आलेले आहेत. सध्या कापसाला महाराष्ट्र मध्ये सरासरी दर हा 7500 रुपये प्रतिक्विंटल ते 7800 रुपये प्रतिक्विंटल एवढ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 8200 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे. काल देऊळगाव राजा येथे कापसाला जास्तीत जास्त जर हा 8050 रुपये प्रति क्विंटल एवढा लागला होता आणि त्यानंतर मानवत बाजार समितीमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. तर मग चला राज्यांमधील संपूर्ण बाजार समितीचे कालचे बाजार भाव जाणून घेऊया.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7650 रु. |
मारेगाव | 7800 रु. |
पारशिवनी | 7400 रु. |
घाटंजी | 7980 रु. |
अकोला | 7630 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 7989 रु. |
देऊळगाव राजा | 8045 रु. |
वारोरा माडेली | 7900 रु. |
काटोल | 7400 रु. |
हिमयंतनगर | 7500 रु. |
परभणी | 8000 रु. |
मानवत | 7980 रु. |
अकोट | 8000 रु. |
Cotton Rate Today – आजचे कापसाचे भाव
तर शेतकरी मित्रांनो बरेच कापूस अभ्यासात तज्ञांनी असा अंदाज लावला आहे की महाराष्ट्र मधील विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांनी जवळपास 80% ते 82% टक्के कापूस विकलेला आहे. आता फक्त 18% ते 20% टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाजारामध्ये कापसाची आवक कमी होत चाललेली आहे आणि कापूस दराची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कधी कापसाला अचानक 8200 पर्यंत भाव लागतो तर कधी कापला 8100 प्रतिक्विंटल भाव लागत आहे. कापसामध्ये दिवसेंदिवस भाव कमी जास्त होत आहे. हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. काही कापूस तज्ञांच्या मते पुढील दोन महिन्यांमध्ये कापसाची आवक कमी झाल्यास दर पुन्हा 5% टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजे एप्रिल ते मे महिन्यामध्ये कापसाला दर किमान 9000 प्रतिक्विंटल पर्यंत होऊ शकतो. हेच शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे आणि कापूस विकायची थोडी वाट पाहावी.
कापसाचे भाव वाढणार आहेत का?
सध्या कापसाला जास्तीत जास्त दर हा महाराष्ट्र राज्यामध्ये 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे आणि त्यातली त्यात बाजारामध्ये कापसाची आवक कमी होत चाललेली आहे. त्यामुळे बऱ्याच कापूस तज्ञांनी असा अंदाज लावला आहे की येत्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढतील. फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये अचानक ज्या प्रकारे कापसाचे 10% टक्क्यांनी वाढ झाली होती त्याचप्रमाणे येत्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा 5% टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. असे तज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काळामध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हे 9000 रुपये प्रति क्विंटल एवढे भेटू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.13/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, कापसाचे भाव वाढणार आहेत का?, Kapus Bajar Bhav Today”