Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सध्या महाराष्ट्र मध्ये कापूस भाव कशाप्रकारे मिळत आहे. तर मित्रांनो आज पुन्हा कापसाचे भाव वाढलेली आहेत. कोणत्या कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे भावमध्ये थोडी तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा श्वासात श्वास घेतलेला आहे. कारण मागच्या दोन हप्त्यांमध्ये कापसाचे भाव अचानक खाली गेल होती आणि याच गोष्टीमुळे शेतकऱ्यांना वाटू लागले की आता कापसाचा भाव वाढतो की नाही? तर शेतकरी मित्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कापसाची मागणी कमी झाली असली आणि भारतीय उद्योगांमध्ये जरी कापसाची मागणी वाढली असली तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य मध्ये आणि गुजरात राज्यांमध्ये कापूस भाव मंदावली आहेत. शेतकरी मित्रांनो सध्या राज्यांमध्ये कापसाला सरासरी 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तर राज्यामध्ये जास्तीत जास्त कापसाला 8200 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. तर मग चला पाहूया संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज कापसाला किती दर मिळाला.
कापूस भाव पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
आजचे कापसाचे बाजार भाव
सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तर कोणत्या कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे भाव 8000 पेक्षा जास्त झाले आहेत फुलंब्री बाजार समितीमध्ये कापसाला 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आज मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना आता वाटत आहे की कापसाचे भाव येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढू शकतात.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
राळेगाव | 7650 |
पारशिवनी | 7200 |
अकोला | 7500 |
उमरेड | 7350 |
देऊळगाव राजा | 7825 |
मांडळ | 6500 |
हिमायतनगर | 7400 |
सिंधी (सेलू) | 7200 |
फुलंब्री | 8200 |
नरखेड | 7100 |
परभणी | 7900 |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो वरच्या टेबलामध्ये तुम्ही पाहिले असेल की कापसाचे दर 8200 रुपये प्रतिक्विंटल वरती गेल आहे परंतु शेतकऱ्यांना कमीत कमी कापसाला 8500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ही कापसाची आवक पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्यानंतर कापूस भाव वाढीचे 100 चान्सेस आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस विकण्याचा प्रयत्न करू नये. काही कापूस अभ्यासकांच्या मते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कापसाचे दर वाढणार आहेत. ज्याप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसाच्या भावात 10% टक्के वाढ झाली होती त्याचप्रमाणे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पुन्हा 5% टक्क्याची वाढ अपेक्षित आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो कापूस तुम्ही टप्प्याटप्प्याने विकावा किंवा एप्रिल महिन्यामध्ये एकदा सर्व विकून टाकावा.
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.31/03/2024, कापसाचे भाव वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”