Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समिती मधील कापसाचे भाव पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव पुन्हा कमी झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी बऱ्याच अडचणी मधून जात आहेत. कारण की शेतकऱ्यांना कापूस चांगल्या दरांमध्ये विकायचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी इतक्या दिवस कापूस साठवून ठेवला होता. शेतकऱ्यांना वाटलं की मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या भावामध्ये चांगली वाढ होईल. परंतु असं काही झालं नाही. याच्या व्यतिरिक्त फेब्रुवारी महिना ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या पर्यंत कापसाला भाव चांगले भेटू लागल. मार्च महिन्याच्या मध्यंतरी कापसाचे भाव 8450 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. परंतु सध्या कापसामध्ये 400 रुपये ती 500 रुपये पर्यंत घट झालेली दिसून येते. तर सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सरासरी दर हा 7200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे. तर हे कापसाचे भाव कधी वाढतील? त्याबरोबरच आज महाराष्ट्रामध्ये कापसाला किती जरी मिळाला? त्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मध्ये ज्या 4 बाजार समित्या कापसाला सर्वोच्च दर देत होत्या आता त्याच बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च कमी दर मिळत आहे. कारण की यामागे खूप मोठं कारण लपलेला आहे. शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी फटाफट कापूस विकून टाकावा यामुळे व्यापारी लोक शेतकऱ्यांसोबत खेळ खेळत आहे, या गोष्टीला घेऊन शेतकऱ्यांनी आपला कापूस विकून टाकू नये कापसाचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा वाढणार आहेत. तर चला पाहूया आज कापसाला किती दर मिळाला.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
राळेगाव | 7555 |
अकोल | 7800 |
घनसावंगी | 7800 |
उमरेड | 7350 |
देऊळगाव राजा | 7765 |
वारोरा खांबाडा | 7350 |
परभणी | 7800 |
वर्धा | 7550 |
सिंधी (सेलू) | 7580 |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाच्या भावात अचानक 10% टक्के वाढ झाली होती. यामध्ये कापसाला अचानक 8100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला पटापट कापूस विकून टाकला. त्यानंतर हा कापसाचा दर मार्च महिन्याच्या मध्यंतरी पर्यंत कायम टिकून राहिला. त्यामध्ये कमी जास्त दर वाढत गेले. मार्च महिन्याच्या मध्यंतरी म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये कापसाला 8450 रुपये एवढा दर मिळत होता. परंतु सध्या एवढा दर मिळत नाहीये. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला जास्तीत जास्त 7800 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील 85% ते 90% टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. आता फक्त 10 टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. तर शेतकरी मित्रांनो हा कापूस शेतकऱ्यांनी बाहेर काढावा यासाठी व्यापारी लोक आणि शासन शेतकऱ्यांना भाग पाडत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या भावात पुन्हा तेजी पाहायला दिसेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस विकण्याचा प्रयत्न करू नये, बऱ्याच कापूस अभ्यासात तज्ञांच्या मते एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाच्या भावात पुन्हा दरवाढ होणार आहे.
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.29/03/2024, कापसाचे भाव का घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”