आजचे कापसाचे बाजार भाव, दि.28/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या कापूस दरामध्ये. शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव पुन्हा घसरल आहे. याचे कारण काय आहे? संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज कापसाला किती दर लागला आहे? याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. परंतु ते सगळं जाणून घेणे अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न नक्की पडले असतील की मागील पंधरवड्यामध्ये कापसाला 8400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत होता. परंतु या दोन-तीन दिवसांमध्ये कापसाच्या भावामध्ये 400 रुपये ते 500 रुपये पर्यंत घट पाहायला मिळाली आहे. तर मित्रांनो याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाची मागणी कमी झाली आहे. त्याबरोबरच शासन भारतातील उद्योगधंद्यांना कापसाचा स्टॉक विकत घेऊ देत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी कापसाचे भाव कमी झाले म्हणून कापूस बाजारामध्ये विकून टाकावा या भीतीपोटीने व्यापारी लोक कापसाचे दर कमी करीत आहेत. तर मग चला पाहूया आज कापसाला किती दर मिळाला.

पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार?, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे महाराष्ट्रातील जवळपास 15 बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला जास्तीत जास्त दर 7800 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे, तर एखादी क्वचित बाजार समिती असेल जिथे कापसाला 8000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत असेल. परंतु कापसाचे भाव पुन्हा माघारी फिरले आहे. तर मग चला पाहूया संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित बाजार समिती मधील कापसाचे दर.

दुष्काळ यादी 2023, 24 जिल्ह्यात दुष्काळ निधीचे वाटप, यादी पहा लवकर, 10 हजार कोटीचे पॅकेज मंजूर, Dushkal Nidhi 2024

बाजार समितीजास्तीत जास्त दर
अमरावती7350 रु.
सावनेर7200 रु.
जामनेर7200 रु.
घाटंजी7575 रु.
उमरेड7300 रु.
मानवत7850 रु.
देऊळगाव राजा7800 रु.
वारोरा-माडेली7550 रु.
नेर परसोपत7000 रु.
काटोल7300 रु.
यावल7190 रु.

Cotton Rate Today

Cotton Rate Today
Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला महाराष्ट्र राज्य मध्ये 7200 रुपये प्रति क्विंटल ते 7400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. तर कोणत्या कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा तर मिळत आहे. मागील पंधरवड्यामध्ये कापसाचे दर हे अचानक वाढले होते आणि बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला 8000 रुपये पर्यंतचा सरासरी दर मिळू लागला. परंतु कापसाचे दर पुन्हा घसरल्याने सध्या शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. कापसाचे दर पुढील महिन्यामध्ये कसे राहतील अशी शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहेत. तर शेतकरी मित्रांनो त्याची तुम्ही काय काळजी घेऊ नका. पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा कापसाचे दर वाढणार आहे. ते फक्त शासनाने आणि व्यापारी लोकांनी शेतकऱ्यांना भीती घालण्यासाठी एक कारण निर्माण केला आहे. सध्या ८५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 15% टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कापसाची मागणी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय कापसाचे मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त कापसाचे उत्पन्न हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत जपून ठेवा.

Yamaha MT 15 Price In Hyderabad, जानिए फीचर्स, माइलेज, इंजन और कीमत के बारे में

1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.28/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”

Leave a comment