Kapus Bajar Bhav Today राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणती बाजार समिती कापसाला सर्वोच्च भाव देत आहे. शेतकरी मित्रांनो मागच्या दोन हप्त्यापासून आपण पाहत आहोत की कापसाचे भाव प्रतिक्विंटल मागे 200 रुपये ते 400 रुपये पर्यंत कमी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. सध्या शासनाने कापसाला 7020 रुपये एवढा हमीभाव दिला आहे. महाराष्ट्र मध्ये कापसाला सध्या 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. तर कोणत्या कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला 8200 प्रतिक्विंटल पर्यंत जास्तीत जास्त दर मिळत आहे. शेतकरी मित्रांनो मागच्या पंधरवड्यामध्ये कापसाचे भाव अचानक 8400 रुपये प्रति क्विंटल वरती गेली होती आणि बऱ्याच बाजार समित्या कापसाला 8000 पेक्षा सुद्धा जास्त दर देत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु कापसाचे भाव पुन्हा माघारी फिरल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कापसाचे दर पुढच्या दोन महिन्यात कसे राहणार आहेत. कापसाचे दर वाढतील का नाही? त्याचबरोबर आज कापसाला किती भाव लागला? तर मग चला पाहूया सर्व काही
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला महाराष्ट्र मध्ये सरासरी दर 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढ मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये कापसाचे दर हे पुन्हा वाढणार आहेत. त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यांमध्ये कापसाच्या भावात 10% टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याचप्रमाणे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाच्या दरामध्ये अचानक 5% टक्के वाढ होईल. असे कापूस तज्ञांचे म्हणणे आहे. शेतकरी मित्रांनो मागील पंधरवड्यामध्ये कापसाचे दर 8450 रुपये पर्यंत गेले होते. त्यामुळे होईल तेवढे शेतकऱ्यांनी आपला कापूस जपून ठेवण्याचा प्रयत्न करावा कापसाचे दर पुन्हा वाढण्याचे चान्सेस आहेत.
पिक विमा , पिकविम्यात मोठे बदल, शेतकऱ्यांना मिळणार एकरी 39,500 रु. पहा कसे, Crop Insurance 2023
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7350 रु. |
राळेगाव | 7550 रु. |
परभणी | 7890 रु. |
मानवत | 7900 रु. |
पारशिवनी | 7300 रु. |
देऊळगाव राजा | 7750 रु. |
काटोल | 7250 रु. |
फुलंब्री | 8200 रु. |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो वरील टेबल अनुसार तुम्हाला समजले असेल की सध्या कापसाला जास्तीत जास्त 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे. तर मागच्या पंधरवड्यामध्ये कापसाचे भाव 8400 रुपये प्रतिक्विंटल वरती गेले होते आणि बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला 8000 पेक्षाही जास्त दर मिळत होता. परंतु सध्या तो मिळत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील 85 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. आता फक्त 15% कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचबरोबर देशातील उद्योगधंद्यांमध्ये कापसाची खूप जास्त गरज भासत आहे. हेच कारण आहे की पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी. एप्रिल मे महिन्यामध्ये कापसाच्या भावात 5% टक्के वाढ होणार असल्याची कापूस तज्ञांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढा आपला कापूस जपून ठेवावा. एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाला अचानक 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळू शकतो असे बऱ्याच व्यापाऱ्यांची म्हणणे आहे.
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.27/03/2024, कापसाचे भाव वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”