Kapus Bajar Bhav Today शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव पुन्हा घसरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढे आपले कापूस सध्या विकण्याचा प्रयत्न करू नये. कारण की ज्या बाजार समितीमध्ये काल-परवा 8300 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता सध्या त्या बाजार समितीमध्ये कापसाला चक्क 7300 रुपये बाजार भाव मिळतोय, होय मी हिंगा बाजार समिती बद्दल बोलत आहे. मित्रांनो अशा बऱ्याच बाजार समिती आहे जेथे एक हप्त्या अगोदर कापसाला दनादन बाजार भाव मिळत होते. परंतु सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जेथे शेतकरी कापूस विकण्यास तयार होत नाहीये. तर अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे या बाबतीमध्ये आज आपण बोलणार आहोत आणि त्यातली त्यात संपूर्ण महाराष्ट्र मधील बाजार समितीला किती भाव लागला आहे याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया सगळे काही.
PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?, लगेच तारीख पहा, PM Kisan Yojana 17th installment
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो खालच्या टेबल मध्ये आपण महाराष्ट्र मधील संपूर्ण बाजार समितीचे जास्तीत जास्त दर दिले आहेत. सध्या मार्केट कमिटी मध्ये कापसाचा भाव कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढे कापूस न विकण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. 12 मार्च रोजी कापसाला 8300 रुपये जास्तीत जास्त दर मिळत होता. सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी दर 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे गणित समजून घेऊन आपला कापूस विकण्याचा प्रयत्न करावा.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
परभणी | 8000 रु. |
मानवत | 7980 रु. |
अमरावती | 7500 रु. |
मारेगाव | 7750 रु. |
अकोला | 7980 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8180 रु. |
उमरेड | 7680 रु. |
देऊळगाव राजा | 7950 रु. |
मांडल | 7500 रु. |
हिंगा | 7300 रु. |
यावल | 7180 रु. |
हिमायंतनगर | 7600 रु. |
सिंधी (सेलू) | 7820 रु. |
फुलंब्री | 7400 रु. |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो वरच्या टेबल अनुसार आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे जिल्हा नुसार जास्तीत जास्त दर पाहिले आहेत. त्यामुळे तुम्हाला सध्या अंदाज आला असेल की सध्या कापूस विकणे म्हणजे मूर्खपणा होय! कारण या मागच्या हप्त्यामध्ये सुरुवातीला कापसाचे भाव अचानक वाढले होते. परंतु या हप्त्याच्या शेवटपर्यंत कापसाचे भाव पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढे थोडे दिवस थांबून कापूस विकण्याचा प्रयत्न करावा. कारण मार्केट कमिटी मध्ये कापसाची आवक वाढलेली आहे. कापसाचे भाव घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी अचानक वाढवलेली आवक यामुळे व्यापाऱ्यांनी कापसाच्या दरामध्ये घसरण केली आहे. शेतकऱ्यांनी आपला कापुस टप्प्याटप्प्याने विकण्याचा प्रयत्न करावा. सध्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. आता 15% पंधरा टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये विकण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये तुम्हाला चांगलं दर मिळू शकतो. काही कापूस अभ्यासकांच्या मध्ये कापसाचा दरामध्ये एप्रिल किंवा मे मध्ये 5% टक्के दर वाढ होऊ शकते. ज्या प्रकारे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये अचानक 10% टक्के भाव वाढ झाली होती.
पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023