Jalgaon Crop Insurance जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नमस्कार! शेतकरी मित्रांनो जळगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झालेले नाही, जळगाव येथील एक रुपयाचा पिक विमा भरून शेतकऱ्यांना आता जवळपास सहा महिन्याच्या वर झाली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी पावसामुळे आणि जास्ती त्यात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाली. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी एक रुपयाचा पिक विमा काढला होता असे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी नाहीतर 20 मार्च रोजी शेतकरी संघटना पिक विम्याच्या कंपन्या वरती मोर्चा काढेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील आणि विनोद धनगर यांनी दिला आहे.
जळगाव नुकसान भरपाई 2023
Jalgaon News शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुख्य पीक कापूस आणि केली आहे खरीप हंगामात या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करावे लागले अपुरा पावसामुळे 50% पिकांचे उत्पन्न जागेवरच घडलं आणि 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पाऊस कालखंडामुळे शेतकरी तर त्रस्त झाले नुकसान भरपाई मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा सुद्धा भरला तरी सुद्धा शेतकऱ्यांना थोड्या पैशाच्या मदती करता विमा कंपन्यांच्या ऑफिस समोर चक्कर मारावी लागत आहे.
जळगाव मधील जवळपास 87 महसूल मंडळी आहेत यापैकी 27 महसूल मंडळात 21 दिवसाचा पाऊस कालखंड पडल्यामुळे या 27 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विम्याचे वाटप करण्यात आले. पण उर्वरित 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकही रुपया नाही भेटला. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शासन जळगाव मधील या 60 महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत. नुकसान झाल्यानंतर तक्रारी नोंदवून पंचनामे करून 5 महिने झाले आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांना काहीच नाही मिळाले.
काही जाहिराती अनुकार असे समजत आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांसाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जळगावची सुद्धा नाव आहे परंतु जळगाव जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे याबाबतची काही फिक्स माहिती आमच्याकडे नाही परंतु मीडिया रिपोर्टर सांगण्यात येत आहे की येत्या 31 मार्चपर्यंत जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे बँक खात्यावरती पिक विमा जमा करण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा पिकविण्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये ते 20 हजार रुपये या दरम्यान पैसे मिळणार आहेत.
कामगारांसाठी खुशखबरी! कामगारांना मिळणार 10 हजार रुपये, सन्मान धन योजना, Sanman Dhan Yojana 2024