Heavy Rain Grant List 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये शेतकरी मित्रांनो 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीनची कापणी झाल्यास म्हणजे दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील तसेच रब्बी हंगामातील पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातले पिके निसर्गाने हिसकावून घेतले ज्यामध्ये कापूस असेल हरभरा असेल, तुर आणि नेमकी पेरलेली रब्बी हंगामातील ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अशी अतिवृष्टी गारपीटीची स्थिती पाहता राज्य शासनाने 01 जानेवारी 2024 रोजी एक निर्णय जाहीर केला ज्यामध्ये नोव्हेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानी करिता शेतीपिकांच्या सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय केला आहे.
अतिवृष्टी अनुदान यादी 2023
शेतकरी मित्रांनो राज्य शासन महसूल व वन विभागाने एक नवीन जीआर सादर केला आहे ज्यामध्ये डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जो काही अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाला होता ज्यामुळे शेती पिकांचे जे काही नुकसान झाले होते या नुकसानी करिता 24 कोटी 67 लक्ष 27 हजार(2467.37) एवढा निधी जाहीर केला आहे. हा निधी चार जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे.
नुकसान भरपाई 2023
अतिवृष्टी, पूर्, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर असे काही झाल्यास राज्य शासन शेतकऱ्यांसाठी पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एक निविष्ठा अनुदान देते. जे पुढच्या हंगामात शेतकऱ्यांचे उपयोगी पडावे असे एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विविध दराने शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत देण्यात येते. मित्रांनो डिसेंबर 2023 जानेवारी 2024 महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या मित्रांसाठी विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक यांच्याकडून नुकसान भरपाई निधी मागण्याचे शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानंतर शासनाने या 4 जिल्ह्याकरिता निधी मंजूर केला आहे. तर चला बघूया ते कोणते चार जिल्हे आहेत आणि त्याच्या मधील किती शेतकरी या नुकसान भरपाई साठी पात्र आहे.
जिल्हा | बाधित शेतकरी संख्या | मंजूर निधी |
नाशिक | 52 | 4.70 कोटी |
भंडारा | 5388 | 589.65 कोटी |
नागपूर | 4432 | 664.18 कोटी |
गोंदिया | 0 | 1208.84 कोटी |
1 thought on “अतिवृष्टी अनुदान यादी 2023, नुकसान भरपाई अनुदान मंजूर, GR सोबत शेतकऱ्यांची यादी पहा, Heavy Rain Grant List 2023”