Sanman Dhan Yojana 2024 सन्मान धन योजना अंतर्गत राज्यातील 55 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना प्रतिवर्षी 10,000 हजार रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचा हा एक नवीन शासनाने जीआर जाहीर केलेला आहे. मित्रांनो या जीआर मार्फत आपण कोणत्या कामगारांना दहा हजार रुपये मिळणार आहेत हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो 06 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत देण्यास एक नवीन जीआर जाहीर करण्यात आलेला आहे.
सन्मान धन योजना 2024
मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजनेअंतर्गत वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु वयाचे 60 वर्षे पूर्ण न झालेले कामगार असतील त्यांची ही घरेलू कामगारांची वयोमर्यादा ठरवली गेली आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांची सामाजिक व आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता एका ठराविक रूपामध्ये सन्मान धन योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील विविध नोंदणी पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ दिल्या जाईल ज्यामध्ये कामगारांना दरवर्षी 10,000 रुपयाची आर्थिक मदत दिल्या जाईल. ती रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर याद्वारे पाठवल्या जाईल योजनेत पात्र होण्यासाठी नोंदणी केलेली खूप गरजेची आहे त्यामुळे कामगारांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करून घ्यावी यासाठी काही ठराविक अटी आणि नियम ठरवले आहेत यासाठी शासन निर्णय घेतला आहे.
51KM च्या मायलेज सोबत लॉन्च झाली नवीन बजाज पल्सर 125 कमी किमतीत धमाका Bajaj Pulser 125
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana
- यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे ती लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत
- लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यापूर्वी लाभार्थी जीवित नोंदणीकृत्व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाकडून खात्री होईल
- अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळी यांनी कार्यपद्धती आवश्यक ते आदेश निर्गमित करावे त्यामध्ये मुक्त अधिनियमाच्या कलम 15(3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहतील याचा उल्लेख करावा
- सदर अर्थसाह्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख मार्फत अर्थशास्त्राची वाटप करण्यात यावी
- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आणि या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा
- वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे
10 रुपयाची आर्थिक मदत नाही रे 10 हजार रुपये आहे
Sorry Sir, My Mistake