PM सूर्य घर मोफत वीज योजना | असा करा अर्ज | PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन योजनेमध्ये, मित्रांनो पंतप्रधान मोदींनी एक नवीन सूर्य घर योजना सुरू केली आहे. ज्यामधून आपल्याला मोफत वीज मिळणार आहे. 2024 च्या अर्थसंकल्पनेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बऱ्याच मोठ्या घोषणा केल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांनी मोफत वीज संदर्भात एक मोठी घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी छतावरील सौर ऊर्जेची संबंधित अनेक घोषणा केल्या होत्या. योजनेमध्ये आपल्याला एक कोटी घरांना सोलार रूपटॉप सह दरमहा 300 युनिट मोफत वीज भेटणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार जवळपास 75 हजार कोटी रुपयांचा खर्च करणारे. हा अर्थसंकल्प सादर होताच काही दिवसांनी नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना ही सुरू केली अगदी नव्याने. तर मग चला सूर्य घर योजनेचा अर्ज कसा करायचा याबद्दल थोडी माहिती घेऊया.

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा सूर्य घर योजनेच्या अंतर्गत तुमच्या घरावरती रूप-टॉप पॅनल साठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाचे ठरेल. आज या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि या स्कीम चा फायदा कसा घ्यायचा याबद्दल थोडी माहिती देणार आहोत. अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाईटला भेट देणे खूप गरजेचे आहे. या वेबसाईटवर तुम्हाला भेट देऊन आपले राज्य निवडणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला एक ठराविक इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी निवडणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कंजूमर नंबर हा भरावा लागेल आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी सुद्धा या सर्व गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ने लॉगिन करणे आहे. मग त्यानंतर हा फॉर्म भरताना रूप-टॉप कोणासाठी अर्ज करावे लागेल आणि त्यानंतर समोर तुम्हाला जेवढ्या काही महत्त्वाची माहिती असेल ती भरणे सुद्धा खूप गरजेची आहे.

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

पीएम सूर्य घर योजनेसाठी सबसिडी कशी मिळेल?

आता तुम्हाला सबसिडी कशी मिळेल याबद्दल आम्ही थोडी माहिती घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला DISCOM करून मंजरी मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी सौर ऊर्जा प्रकल्प DISCOM मध्ये नोंदणी करून विक्रेत्याकडून मिळू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सोलार प्लांट बसवल्यानंतर त्याचा अर्ज सादर करावा लागेल. हे सर्व काही केल्यानंतर तुम्हाला नेट मीटर साठी सुद्धा अर्ज करावे लागेल. नेट मीटर बसवल्यानंतर DISCOM त्याची तपासणी करेल आणि मग कमिशनिंग प्रमाणपत्र तुम्हाला पाठवेल आणि मग तुम्हाला सबसिडीचा फायदा घेण्यासाठी मिळण्यासाठी तुम्हाला पोर्टल वर जाऊन तुमचे बँक खाते आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी द्याव्या लागतील. मग काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती सबसिडी मिळून जाईल.