Free Silai Machine Yojana 2024 मित्रांनो राज्यांमध्ये सध्या शासनाने एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन अनुसूचित जातींना आणि दिव्यांग व्यक्तींना देण्याची अंमलबजावणी राज्य शासनाने केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर आपल्याला शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना 31 मार्च 2024 ही अंतिम तारीख दिली आहे. जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्व माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, निकष आणि नियम या सर्व गोष्टी या लेखांमध्ये दिले आहे. तुम्ही वाचून घ्याव्या.
मोफत झेरॉक्स मशीन योजनेची पात्रता काय आहे?
मोफत झेरॉक्स मशीन योजना अंतर्गत राज्यातील दिव्यांग(Handicap) महिला व दिव्यांग(Handicap) पुरुष फक्त यांच्यासाठीच ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना फक्त या दिव्यांग(Handicap) व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधार होण्याकरिता सुरू केलेली आहे याचा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील समाज कल्याण विभागाकडे जाऊन अर्ज करणे महत्त्वाचे आहेत एकदा तुम्ही अर्ज केला की लवकरच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने झेरॉक्स मशीन चे वाटप करण्यात येईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे लागतील ते खालील प्रमाणे तुम्ही वाचून घ्यावी.
मोफत शिलाई मशीन योजना
मोफत शिलाई मशीन करिता पात्रता काय आहे याबद्दल बोलले जावं तर ही योजना फक्त त्याच महिलांसाठी राबवली जात आहे ज्या महिला शरीराने दिव्यांग आहेत. या महिला अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडल्या पाहिजेत. तरच अशा महिलांना मोफत शिलाई मशीनच वाटप होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना समाज कल्याण मध्ये जाऊन अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
कागदपत्राबद्दल बोलले जावं तर सर्वप्रथम आपल्याला लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शाळेतील टीसी, रहिवासी दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, मतदान कार्ड, मूकबधिर दिव्यांगाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र लागतात आणि जर तुम्हाला यावैतिरिक्त दुसरे एखादे कागदपत्र लागत असेल तर ते तुम्ही स्वतः समाज कल्याण मध्ये जाऊन विचारावे.
2 thoughts on “मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन योजना, 100% अनुदान, लवकर करा अर्ज, Free Silai Machine Yojana 2024”