मोफत वाळू योजना! घर बांधण्यासाठी मिळेल मोफत वाळू? राज्य सरकारची नवीन योजना, लवकर करा अर्ज Free Valu Yojana

Free Valu Yojana नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहे. ही योजना राज्य सरकार द्वारे चालवल्या जात आहे आणि या योजनेचे नाव आहे मोफत वाळू योजना. म्हणजे आपल्याला खरोखरच राज्य सरकारकडून मोफत वाळू भेटणार आहे. मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे? ही योजना कोणासाठी आहे? मोफत वाळू कोणाला भेटल्या जाऊ शकते? आणि किती भेटले जाऊ शकते? याबद्दल आपण सर्व काही चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला घर बांधायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी एकदम कामाची आहे. या योजनेमधून तुम्हाला 5 ब्रास पर्यंत वाळू भेटणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर जास्त वाळू पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही एक उपाय घेऊन आलेलो आहोत. शिंदे सरकारने हा निर्णय घेऊन गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक गरजू आणि गरीब लोकांना वाळू मिळू शकते.

मोफत वाळू योजनेसाठी काय पात्रता आहे?

Free Valu Yojana-मोफत वाळू योजनेसाठी काय पात्रता आहे?
Free Valu Yojana-मोफत वाळू योजनेसाठी काय पात्रता आहे?

मोफत वाळू योजनेसाठी राज्य सरकारने बरेच काही नियम आणि कायदे आकारले गेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ज्या व्यक्तीला घरकुल मिळाले आहे केवळ अशाच व्यक्तीला मोफत वाळू भेटणार आहे. यासाठी त्या व्यक्तीने केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असावा. अर्जदार हा गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील असणे खूपच गरजेचे आहे. त्याबरोबरच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर अर्जदार मोफत वाळू साठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा, वाळूची बुकिंग केली असल्यासच वाळू भेटणार आहे. आणि वाळू फक्त 5 ब्रास पर्यंत मिळणार आहे. जर अर्जदाराला अधिक वाळू पाहिजे असेल तर 600 रुपये ब्रास दर आकारला जाईल आणि त्याबरोबरच लाभार्थ्यांना वाळू वाहतुकीचा खर्च लागतो.

मोफत वाळू योजनेसाठी अर्ज कसा करावा?

मोफत वाळू करिता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरची क्लिक करणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही रेवेन्यू डिपार्टमेंट गोरमेंट ऑफ इंडिया या सरकारी वेबसाईट पोर्टल वरती जाल. त्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन, बुकिंग आणि पेमेंट, ट्रॅक युवर बुकिंग आणि सेंड डिलिव्हरी स्टेप हे 4 ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करून सर्व काही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती काही रिसिप्ट वगैरे प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात जाऊन ही सर्व काही प्रोसेस करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा-https://mahakhanij.maharashtra.gov.in/sandbooking/home

Leave a comment