केवायसी न केल्यामुळे शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित, दुष्काळ यादी 2023, Dushkal Nidhi 2024 ekyc

Dushkal Nidhi 2024 ekyc शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केल्या त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटले याच कारणी राज्यांमध्ये तब्बल 15 जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाले बऱ्याच शेतकऱ्यांना एकही रुपयांचे उत्पन्न यंदा झालं नाही त्यामुळे ऑक्टोबर 2023 मध्ये शासनाने जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये शासनाने एक नवीन जीआर जाहीर केला ज्यामध्ये या 40 तालुक्यासाठी 2443 कोटी 22 लाख 71 हजार एवढा निधी मंजूर केला हा निधी जवळपास 22 लाख 24 हजार 934 शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे

दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

दुष्काळ यादी 2023

आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांची केवायसी करणे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याकडे केवायसीच्या याद्या पाठवल्या त्यानंतर जिल्ह्याकडून महसूल मंडळाकडे या याद्या पाठवण्यात आले आहेत त्यानंतर महसूल मंडळाकडून या केवायसीच्या याद्या प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, संगणक कर्मचारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत ज्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या सोप्या पद्धतीने केवायसी करण्यात येईल आणि ही केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात येत आहे

KYC करिता पात्र शेतकऱ्यांची आणि तालुक्यांची यादी पहा

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहाय्यता कडे जाऊन आपली केवायसी पार पाडावी शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतर दुष्काळ अनुदानाचे पैसे बँक खात्यावर जमा होत आहेत यामध्ये शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे आणि ही मदत हेक्टरी 8500 रुपये ते 24 हजार रुपये मिळणार आहे.

पिक विमा 2023, 75% पिक विमा कुठे अडकला, सरसकट पिक विमा कधी मिळणार? Pik Vima 2024

1 thought on “केवायसी न केल्यामुळे शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित, दुष्काळ यादी 2023, Dushkal Nidhi 2024 ekyc”

Leave a comment