Dushkal Anudan Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो खरीप हंगामातील नोव्हेंबर महिन्यात राज्य शासनाने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता आता. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाने या दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दुष्काळग्रस्त 40 तालुक्यातील लाभार्थ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. या दुष्काळ अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खाते मध्ये 5 मार्च पासून वितरित करण्यास सुरू होणार आहेत. तर चला आपण जाणून घेऊया या 40 तालुक्यांमध्ये किती रुपयाचा निधी मंजूर झाले आहे. यासाठी हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत. या सर्व काही बाबी आपण पाहून घेणार आहोत.
खरीप दुष्काळ अनुदान 2023
खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी गारपीट अवकाळी पाऊस दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्ती पासून शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्याच्या पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना कर्ज भागवण्याकरिता एक वेळेस आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ठ अनुदान दिले जाते दिनांक 9 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयाद्वारे जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती पासून झालेल्या शेती पिकांचे नुकसान करिता दोन हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर करण्यात आली होती त्यानंतर दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यामधील लाभार्थ्यांना मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर पर्यंत मर्यादित निधी वाटप केल्या जाईल.
खरीप दुष्काळ अनुदान 2023 निधीचे वाटप
खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक नदीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून(244322.71) एकूण 2 हजार 443 कोटी 22 लक्ष 71 हजार रुपये एवढा निधी वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
2 thoughts on “40 तालुक्यात दुष्काळ अनुदान मंजूर, हेक्टरी किती रुपये मिळणार? दुष्काळ अनुदान 2023, यादी पहा, Dushkal Anudan Crop Insurance”