जालन्यातील 5 तालुक्यांना दुष्काळ अनुदान मंजूर, हेक्टरी किती मिळणार?, जालना दुष्काळ अनुदान 2023, Jalna Dushkal Anudan 2023

Jalna Dushkal Anudan 2023 राम राम जालनाकर! तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होत. याकरिता ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. त्यामध्ये जालन्यातील 5 तालुक्यांचा समावेश आहे. अशा तालुक्यांना किती कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे आणि हेक्टरी शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहेत, त्या सर्व गोष्टी या लेखांमध्ये डिस्कस केले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा असे सर्व 5 तालुके या दुष्काळ अनुदानासाठी पात्र आहेत. या दुष्काळ अनुदान करिता एकूण जालना जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 576 शेतकरी पात्र आहेत. आता या शेतकऱ्यांना बागायत, बहुवार्षिक पिके यानुसार किती अनुदान दिले जाणार आहे याबद्दल आपण सर्व काही चर्चा करणार आहोत. त्यामुळे सर्व काही वाचून घ्यावे.

जालना दुष्काळ अनुदान 2023

जालना दुष्काळ अनुदान 2023
जालना दुष्काळ अनुदान 2023

खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याकरिता 40 तालुक्यांसाठी 243 कोटी 22 लक्ष 71 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी 5 मार्च 2024 पासून शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये वाटपास सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांनी या सुद्धा योजना वाचाव्या

PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option

बोरवेल अनुदान योजना, शेतकऱ्यांना फुकट मिळणार बोरवेल त्यासोबत पंप सुद्धा, अर्ज कसा करायचा पहा?, Borewell Anudan Yojana

40 तालुक्यात दुष्काळ अनुदान मंजूर, हेक्टरी किती रुपये मिळणार? दुष्काळ अनुदान 2023, यादी पहा, Dushkal Anudan Crop Insurance

अतिवृष्टी पूर चक्रीवादळ दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य सरकार आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देत असते. शेतकरी मित्रांनो शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 च्या कालावधीमध्ये जे काही शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाले होते याकरिता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत दिल्या जाईल.

जालना दुष्काळ अनुदान निधी 2023

जालना दुष्काळ अनुदान निधी 2023
जालना दुष्काळ अनुदान निधी 2023

शेतकरी मित्रांनो जालना दुष्काळ अनुदानासाठी जवळपास पाच तालुके पात्र असून त्या पास तालुक्यामधील एक लाख 56 हजार 576 शेतकरी पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 18 हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे जालना जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यांसाठी 38221.69 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी 5 मार्चपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरू होणार आहे.

GR पाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment