Dushkal Yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो शासनाने अखेर चाळीस तालुक्यासाठी अनुदान मंजूर केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या 40 तालुक्यासाठी राज्य शासनाने 22 लाख 34 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 2243 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आपल्याकडे तालुक्याची यादी सुद्धा आलेली आहे. कोणत्या 15 जिल्ह्यांमधील कोणते 40 तालुक्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे हे आपण सर्व काही या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूरी मित्रांनो हे जाणून घ्या की हा दुष्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला ुष्काळ अनुदान 2023 करता हेक्टरी किती रुपयांची मदत मिळणार आहे. या सर्व गोष्टी या लेखांमध्ये दिल्या आहेत त्या तुम्ही सर्व स्टेप बाय स्टेप वाचून घ्यावा.
खरीप हंगाम 2023 दुष्काळ
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी एक नवीन जीआर निर्गमित केला आहे. त्यामध्ये खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांसाठी निविष्ठा अनुदानासाठी मंजुरी दिली आहे. जीआर मध्ये लिहिले आहे की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर पुढील एका हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस राज्य शासनाकडून आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने अनुदान दिले जाते. ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यानुसार शेतकऱ्यांना 2 हेक्टर एवजी 3 हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आहे. यामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यामधील शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी हे अनुदान वाटप करण्याकरिता 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
पिक विमा 2024, 75% पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024
दुष्काळ यादी 2023
(जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
दुष्काळ अनुदान 2023
शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 मध्ये जो काही दुष्काळ पडला होता ज्यामध्ये शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. यानंतर या तालुक्यामधील शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2443 कोटी 22 लाख 71 हजार एवढा निधी मंजूर केला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 11 मार्च पासून 31 मार्च पर्यंत जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अतिवृष्टी, पूर, गारपीट अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिके यांना अनुदान मिळणार आहे. यामध्ये जसे की सोयाबीन, कापूस, मका, पालेभाज्या इत्यादी सर्व पिकांना अनुदान मिळणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या तक्रारी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे मांडल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये मिळणार आहेत.
2 thoughts on “दुष्काळ यादी 2023, दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी अनुदान मंजूर, यादी पहा, दुष्काळ अनुदान 2023, Dushkal Yadi 2023”