Dushkal Nidhi 2024 शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास 178 तालुक्यामधील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो यासाठी जवळपास शासनाकडून 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांच 50 टक्के पेक्षा जास्त खरीप हंगामामध्ये नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर शेतकरी मित्रांनो असा हा एक नवीन जीआर शासनाने जाहीर केला आहे. ज्यामध्ये दुष्काळ निधीचे वाटप एकूण 24 जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. तर मग चला पाहूया जिल्ह्यांची यादी आणि जिल्ह्यामधील किती महसूल मंडळ पात्र आहेत याची सुद्धा यादी पाहूया.
दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
दुष्काळी अनुदान 2023
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे, जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेली पैसे देखील वाया गेले त्याबरोबरच मेहनतीचे आणि खत बियाणांचे सुद्धा पैसे वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना येथे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.
Dushkal Nidhi 2024
शेतकरी मित्रांनो या दुष्काळ निधीची वाटप त्याच शेतकऱ्यांना होणार आहे ज्या महसूल मंडळामध्ये 75 टक्के पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. अशा 178 तालुक्यामधील सुमारे 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. यासाठी जवळपास राज्य शासनाकडे 3200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सुमारे 9410 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. अशी जवळपास 10 हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार आहे. या दुष्काळ निधीमध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत याची खाली यादी दिली आहे ती पाहून घ्या.
दुष्काळ यादी 2023
शेतकरी मित्रांनो जवळपास 24 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आहे. ज्यामध्ये कोकणातील काही भाग ठाणे, आणि नांदेड हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने हा निधी मंजूर करण्यात मान्यता दिली आहे. तर मग चला पाहूया या यादीमध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत आणि त्याबरोबरच जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहेत.
पिक विमा , पिकविम्यात मोठे बदल, शेतकऱ्यांना मिळणार एकरी 39,500 रु. पहा कसे, Crop Insurance 2023
पात्र जिल्हे | एकूण महसूल मंडळ |
अहमदनगर | 87 |
छत्रपती संभाजीनगर | 42 |
जालना | 57 |
बीड | 70 |
धाराशिव | 51 |
सोलापूर | 8 |
सांगली | 26 |
सातारा | 37 |
परभणी | 39 |
हिंगोली | — |
वाशिम | — |
अकोला | 42 |
पुणे | — |
नांदेड | — |
नाशिक | 52 |
यवतमाळ | — |
धुळे | — |
नंदुरबार | — |
नागपूर | — |
बुलढाणा | 24 |
भंडारा | — |
लातूर | 52 |
वर्धा | — |
कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana
Why their is no mame of baramati (dhakale grampanchayat ) name in that list their is not enough water from last 2 years so please look at it
okk sir i will mention it!!