दुष्काळ अनुदान भरपाई, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान वाटप, यादी पहा, दुष्काळ यादी 2023, Dushkal Yadi 2023

Dushkal Yadi 2023 शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाने एक नवीन जीआर सादर केला आहे. ज्यामध्ये जवळपास 34 लाख शेतकऱ्यांसाठी 2200 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. या निधीचे वाटप शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे सुद्धा मिळाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दुष्काळामुळे नुकसान सहन करावे लागले आहेत. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये शासन देत आहे. या 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे. याची सर्व सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.17/03/2024, कापसाचे भाव वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

दुष्काळ यादी 2023 – Dushkal Yadi 2023

दुष्काळ यादी 2023 - Dushkal Yadi 2023
दुष्काळ यादी 2023 – Dushkal Yadi 2023

खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल. कारण की उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये २१ दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांची 50% पेक्षा जास्त उत्पन्न कमी झाले. तर काही शेतकऱ्यांची सर्व उत्पन्न जागेवर जळून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे बियांचे खतांचे आणि मेहनतीचे पैसे वाया देखील गेले. त्यामुळे राज्यातील 43 तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात घाटा सहन करावा लागला आणि आर्थिक संकटातून सुद्धा जावे लागले. ज्यामुळे शासनाने सुमारे 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर 2 लॉन्च केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त तालुके असून जालना जिल्ह्यातील 5 आणि सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुके आहेत. या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची भात, सोयाबीन, कापूस, मका, केळी इत्यादी पिकांचे नुकसान झाले होते या सर्व शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे.

पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023

दुष्काळ अनुदान वाटप 2023

दुष्काळ अनुदान वाटप 2023
दुष्काळ अनुदान वाटप 2023
  • शेतकरी मित्रांनो 16 जिल्ह्यामधील 43 तालुके या दुष्काळ अनुदानासाठी पात्र आहेत ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील जवळपास 3 लाख 50 हजार एवढी शेतकरी असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 155 कोटी 74 लाख एवढा निधी मंजूर केला आहे.
  • जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास 4 कोटी 88 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील 16 हजार 921 शेतकरी पात्र आहेत.
  • अहमदनगर जिल्ह्यासाठी जवळपास 160 कोटी 28 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख 31 हजार 831 शेतकरी पात्र आहेत.
  • सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 82 हजार 534 शेतकरी पात्र असून सोलापूर जिल्ह्यासाठी 111 कोटी 41 लाख एवढा निधी मंजूर आहे.
  • सातारा जिल्ह्यातील जवळपास 40 हजार 406 शेतकरी पात्र असून सातारा जिल्ह्यासाठी 6 कोटी 74 लाख एवढा निधी जिल्हा आहे.
  • सांगली जिल्ह्यातील 98 हजार 372 शेतकरी पात्र असून सांगली जिल्ह्यासाठी 22 कोटी 4 लाख निधी मंजूर आहे.
  • बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार 574 शेतकरी पात्र असून बीड जिल्ह्यासाठी 241 कोटी 21 लाख रुपये निधी मंजूर आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यासाठी 18 कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर असून बुलढाणा जिल्ह्यातील 36 हजार 358 शेतकरी पात्र आहेत.
  • धाराशिव जिल्ह्यासाठी 218 कोटी 85 लाख निधी मंजूर असून धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 98 हजार 720 शेतकरी पात्र आहेत
  • अकोला जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार 253 शेतकरी पात्र असून अकोला जिल्ह्यासाठी 97 कोटी 29 लाख एवढा निधी मंजूर आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकरी पात्र असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी फक्त 13 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
  • जालना जिल्ह्यातील 3 लाख 70 हजार 625 शेतकरी पात्र असून जालना जिल्ह्यासाठी 160 कोटी 48 लाख एवढा निधी मंजूर आहे.
  • परभणी जिल्ह्यातील 41 हजार 970 शेतकरी पात्र असून या जिल्ह्यातील दुष्काळ अनुदान वाटप जवळपास 206 कोटी 11 लाख रुपयांची होणार आहे.
  • नागपूर जिल्ह्यातील जवळपास 63 हजार 422 शेतकरी पात्र असून नागपूर जिल्ह्यासाठी 52 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
  • लातूर जिल्ह्यासाठी जवळपास 244 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर असून लातूर जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 535 शेतकरी पात्र आहेत.
  • अमरावती जिल्ह्यासाठी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर असून अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 265 शेतकरी पात्र आहेत.

Leave a comment