दुष्काळ अनुदान 2023, तुम्हाला मिळाले का दुष्काळाचे पैसे? दुष्काळ निधी केवायसी यादी पहा, Dushkal Nidhi 2024 e-kyc List

Dushkal Nidhi 2024 e-kyc List मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे जवळपास 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. यासाठी 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकरिता शासनाने तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा पॅकेज मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो हे दुष्काळाचे पैसे तुमच्या बँक खात्यावर लवकरच पडणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस जर तुम्ही नाही केली तर तुमच्या बँक खात्यामध्ये दुष्काळ निधीचे पैसे जमा होणार नाहीत. तर चला मग सर्व पद्धतशीर माहिती जाणून घेऊया.

दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या

दुष्काळ अनुदान 2023

दुष्काळ अनुदान 2023
दुष्काळ अनुदान 2023

शेतकरी मित्रांनो दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 मार्च पर्यंत जमा करण्यात येणार होता परंतु आता तो 10 एप्रिल पर्यंत जमा होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या उशिरा प्रेरणा झाल्या त्याबरोबरच जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये 21 दिवसापेक्षा पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न कमी झाले. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न भेटले नाही. त्यामुळे अशा 40 तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 24 हजार रुपये देण्याची आश्वासन शासनाने दिले आहे. शासनाने शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्याची जीआर मध्ये जाहीर केले आहे. म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये त्याचबरोबर अशी 3 हेक्टर पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

पिक विमा 2023, 75% पिक विमा कुठे अडकला, सरसकट पिक विमा कधी मिळणार? Pik Vima 2024

दुष्काळ निधी केवायसी यादी

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दुष्काळ निधीचे पैसे हवे असतील तर सर्वप्रथम तुम्ही केवायसी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तालुक्यातील तलाठी कार्यालयात, आणि तालुक्यातून महसूल मंडळाकडे त्यानंतर महसूल मंडळाकडून प्रत्येक गावातील ग्रामसेवकाकडे ई-वायसीच्या याद्या जाहीर करून वाटप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही गावातील ग्रामसेवकाकडे जाऊन आपली केवायसी करून घ्यावी. जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये दुष्काळाचे पैसे जमा होतील.

पिक विमा 2023, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, 75% पिक विमा कधी मिळणार? पात्र शेतकऱ्यांची यादी, Pik Vima 2023

1 thought on “दुष्काळ अनुदान 2023, तुम्हाला मिळाले का दुष्काळाचे पैसे? दुष्काळ निधी केवायसी यादी पहा, Dushkal Nidhi 2024 e-kyc List”

Leave a comment