नुकसान भरपाई 2023, या जिल्ह्यांना डिसेंबर 2023 नुकसान भरपाई मिळणार, हेक्टरी किती मिळणार?, Nuksan Bharpai 2023

Nuksan Bharpai 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. मित्रांनो मागील
खरीप हंगाम 2023 शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त घातक ठरलेला आहे. कारण की या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पुरेसा पाऊस पण झाला नाही आणि त्याबरोबरच 21 दिवसापेक्षा पडलेल्या जास्त पावसाचा कालखंडामुळे शेतकऱ्यांचे पीक हे जागेवरच जळाले आणि शेतकऱ्यांची 50% पेक्षा जास्त पीक हातातून गेले. दिवाळीनंतरच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसान भरपाई करिता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने एक नवीन GR काढला आहे. ज्यामध्ये डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी एक निश्चित निधी ठरवण्यात आलेला आहे. आणि या नुकसान भरपाई करिता 4 जिल्हे निवडले आहेत. त्यामध्ये नाशिक भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना हा निधी वाटप करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

नुकसान भरपाई 2023

नुकसान भरपाई 2023
नुकसान भरपाई 2023

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी, पुर, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने मदत देत असते. यामुळे डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार आहे. या नुकसान भरपाईची मागणी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून शासनास प्राप्त झाली होती.

जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई निधी

जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई निधी
जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई निधी

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून 24 कोटी 67 लक्ष 37 हजार(रु.2467.37) एवढा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी नागपूर, गोंदिया, भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यांकरिता जाहीर केलेला आहे. हा निधी लाभार्थ्यांचे बँक खात्यावर कधी जमा होईल याबद्दल काही माहिती जीआर मध्ये सापडली नाही. परंतु जीआर नुसार असे लक्षात येते की पुढील एक महिन्याच्या आत या 4 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा होईल.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana

PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option

जिल्हेमंजूर निधी
नाशिक4.70 कोटी रु.
भंडारा589.75 कोटी रु.
नागपूर664.18 कोटी रु.
गोंदिया1208.84 कोटी रु.

1 thought on “नुकसान भरपाई 2023, या जिल्ह्यांना डिसेंबर 2023 नुकसान भरपाई मिळणार, हेक्टरी किती मिळणार?, Nuksan Bharpai 2023”

Leave a comment