Chief Minister Vyoshree Yojana 2024 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन लेखांमध्ये मित्रांनो जर तुमच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचे वय 65 वय वर्ष किंवा 65 पेक्षा जास्त वय वर्ष असेल असे नागरिकांसाठी राज्य शासनाने खूप महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये आणि साधने उपकरणे अगदी मोफत मिळणार आहेत. ही साधने/उपकरणे कशा प्रकारची मिळणार आहेत ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला या योजनेचा अगदी मोफतपणे फायदा घ्यायचा असेल तर या योजनेच्या अटी आणि नियम काय आहेत आणि त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे काय आहेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया सगळं काही.
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 चा शुभारंभ आज म्हणजे 7 मार्च 2014 रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दत्तवाडी कळवा जिल्हा ठाणे येथे, शुभहस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रमुख उपस्थिती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दादा यांच्या हस्ते होणार आहे.
मित्रांनो ही योजना अगदी नव्याने सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ज्या नागरिकांचे वय 65 वय आहे किंवा ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त वय असेल ज्यांना पायाने चालणे खूप अवघड जात असेल त्यांच्यासाठी व्हीलचेअर, ज्या ज्येष्ठ नागरिकांना दिसायला खूपच त्रास होत असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना चष्मा. ज्या ज्येष्ठ नागरिकांना ऐकायला खूपच कमी येत असेल अशा नागरिकांना अगदी मोफत श्रवण यंत्र. याच प्रकारे नागरिकांना ट्रायपॉड स्टिक, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, सायकल कॉलर इत्यादी साधने अगदी मोफत दिल्या जातील. ही साधने त्याच ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जातील त्या ज्येष्ठ नागरिकांना याची अत्यंत गरज आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे निधी वितरण/अर्थसहाय्य
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक या योजनेकरिता पात्र असतील त्या नागरिकांना थेट वितरण करण्यात येईल. डायरेक्ट बँक ट्रान्सफर वितरण प्रणाली द्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचा मर्यादित निधी वितरित केल्या जाईल. राज्यामध्ये शासनातर्फे 100% अर्थसहाय्य दिला जाईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- स्वयंघोष पत्र
- शासनाने ओळख निश्चित करण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा
सदर योजना करिता अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दल काही जास्त माहिती दिलेली नाहीये. परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजना शुभारंभ हा 7 मार्च रोजी झाल्यामुळे या योजनेची एक नवीन अधिकृत वेबसाईट असू शकते. ज्या वरती तुम्ही अर्ज करू शकता. ज्याप्रमाणे राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी स्वतंत्र अधिकृत वेबसाईट आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी सुद्धा एखादी स्वतंत्र वेबसाईट तयार करून शकतात त्याची माहिती तुम्ही youtube वरी पाहून घ्यावी.
कामगारांसाठी खुशखबरी! कामगारांना मिळणार 10 हजार रुपये, सन्मान धन योजना, Sanman Dhan Yojana 2024
1 thought on “मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार आणि साधने मिळणार मोफत, Chief Minister Vyoshree Yojana 2024”