Beed Pik Vima list 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने एकूण 16 जिल्ह्यासाठी 75% खरीप पीक विम्याची मंजुरी दिली आहे. राज्यामध्ये हा खरीप पिक विमा 2023 च्या वाटपास 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या विमा साठी जवळपास 35 लाख शेतकरी पात्र असून 1800 कोटी एवढा निधी मंजूर केला आहे. 75% खरीप पिक विमा वाटपासाठी बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, वाशिम, हिंगोली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर असे 16 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे. तर आता आपण बीड जिल्ह्यामधील किती शेतकरी पात्र आहेत? आणि बीड जिल्ह्याला किती निधी मंजूर झालेला आहे? याबद्दल माहिती घेणार आहोत.
बीड खरीप पिक विमा 2023 किती शेतकरी पात्र?
तर बीड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. 26 फेब्रुवारी 2024 पासून 75% खरीप पिक विमा वाटपास सुरू होणार आहे. तर बीड जिल्ह्यातील जवळपास 7,70,574 एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी 241.21 कोटीचा निधी मंजूर केला आहे. शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये जवळपास 64 गावे पात्र आहे आणि यांसाठी कमीत कमी 48% पिक विमा मंजूर केला आहे.
PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? तारीख पहा, PM Kisan 16th installment
खरीप पिक विमा 2023
महाराष्ट्र पिक विमा योजना 2016 मध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. मित्रांनो ही योजना केंद्र सरकारची असलेली प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा एक भाग आहे जो राज्यस्तरावर चालवल्या जातो. या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे नैसर्गिक रीत्या जर काही शेती पिकांचे नुकसान झाले जसे की अतिवृष्टी, अति पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ इत्यादीमुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत नाहीत. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ही एक रुपयाचा पिक विमा 2023 मध्ये काढलेला असेल तर तुम्हाला हा पिक विमा भेटणार आहे.