Bambu Lagwad Yojana 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो टायटल वाचून तुम्हाला समजलेच असेल की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आज आपण बांबू लागवड अनुदान योजनेबद्दल बोलणार आहोत. या योजना अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना तब्बल 80 टक्के अनुदान घोषित केला आहे. जे की आपल्याला बांबू लागवड झाल्यास दोन वर्षांमध्ये मिळत असतं. त्यानंतर जसे बांबू लागवड होऊन दोन वर्ष होतात की लगेच बांबूचे उत्पन्न तुमच्या कामाला येते. बांबूंच भारतामध्ये 26000 कोटी एवढं मार्केट आहे. त्यामध्ये क्लाय बोर्ड, कार्टून इंडस्ट्री, बांबू मॅट बोर्ड, बांबू फर्निचर आणि एवढेच नव्हे तर बांबूपासून इथेनॉल सुद्धा बनवले जाते. त्यामुळे तुम्ही समजू शकता की बांबूची किती जास्त मागणी आहे आणि बांबू विकण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये अगदी सहजपणे व्यापारी सुद्धा मिळू शकतात. जे की बांबू तुमच्या शेतामधून काढून लगेच तुमच्या हातावरती बांबूच्या उत्पन्नाचे पैसे ठेवतील. तर चला मग या योजनेबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया.
बांबू लागवड अनुदान योजना 2024
शेतकरी मित्रांनो बांबू लागवड अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळत असतं. जे की दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळत. शेतकरी मित्रांनो योजनेअंतर्गत तुम्हाला 7 लाख रुपयांची अनुदान मिळते. यासाठी तुमच्याकडे एक हेक्टर जमीन असणे खूप गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे पाण्याचा स्त्रोत म्हणजे विहीर किंवा बोर सुद्धा गरजेचे आहे. जर तुमच्याकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही तर तुम्हाला विहिरीसाठी 4 लाख रुपयांचे अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी या योजनेमधून दिल्या जातात. म्हणजे सरकार तुमच्यासाठी एवढं झटपट करत आहे आणि तुम्ही या योजनेवर लक्ष देत नाही. या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व काही मिळत आहे विशेष म्हणजे बांबू लागवड झाल्यास अगदी दोन वर्षानंतरच तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांबूला अतिवृष्टी. दुष्काळ, वादळ या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. इतर पिकापेक्षाही या पिकामध्ये खूप कमी खर्च आहे. त्यामुळे तुम्ही बांबू लागवडी कडे थोडं लक्ष दिलं पाहिजे.
बांबू लागवड योजनेचे फायदे
शेतकरी मित्रांनो या योजनेचे नाव ‘अटल बांबू समृद्धी योजना’ आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला 7 लाख रुपयांचे अनुदान मिळतं. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी ही धडपड शासनाची आहे. ज्यामुळे शासन तुम्हाला लवकरात लवकर अनुदान 100 टक्के देणार. कारण की बांबू लागवडीपासून हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण कमी होते. त्यामुळे राज्याला आणि देशाला या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे. तसेच या योजनेअंतर्गत खेड्यापाड्यांमध्ये रोजगारही निर्माण होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नालाही चालना मिळतो. विशेष म्हणजे बांबू प्रजातीचे जीवन चक्र 40 वर्षे ते 100 वर्षे पर्यंत असते. त्यामुळे तुम्हाला दरवर्षी बांबू लागवड करायची गरज नाही. म्हणून तुम्ही एकदा बांबू लागवड केली की तुम्हाला दोन वर्षानंतर चक्क 50 ते 100 वर्षे पर्यंत त्याचे उत्पन्न मिळत राहते.
बांबू लागवड योजनेचा अर्ज कसा करावा
बांबू लागवड योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे असतील फार महत्त्वाचे आहेत जसे की सातबारा अ-उतारा, वन प्रमाणपत्र, हमीपत्र, विहीर असलेले प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, शेताचा नकाशा इत्यादी कागदपत्रे घेऊन तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी वन विभागाच्या कार्यालयात जायचे आहे. तेथे तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे जो तुम्हाला तुमच्याकडून अटल बांबू समृद्धी योजनेचा फॉर्म भरून घेईल आणि यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुमच्याकडून जमा करून येईल आणि मग तुमच्याकडून हा अर्ज भरला जाईल.
2 thoughts on “बांबू लागवड अनुदान योजना 2024, ८० टक्के अनुदान, मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न, Bambu Lagwad Yojana 2024”