Bamboo Plantation Subsidy शेतकरी मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन काही ना काहीतरी योजना राबवतच असते. या योजना पैकी एक योजना म्हणजे बांबू लागवड अनुदान योजना. मित्रांनो ही योजना अतिशय प्रसिद्ध असून महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदान देत असतात. हे अनुदान 80% एवढा असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7 लाख रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त नागरिक शेती करतात त्यामुळे बऱ्याच खेड्यापाड्यातील लोकांचा व्यवसाय हा शेतीत आहे. मित्रांनो शेती करायची एवढी सोपी राहिली नाही. अतिवृष्टी दुष्काळ वादळ इत्यादी गोष्टीमुळे शेतीच खूपच नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7 लाख रुपयांचे अनुदान मिळते आणि बांबूला अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ इत्यादी गोष्टीचा काहीच फरक पडत नाही.
शेतकरी मित्रांनो बांबूंचा उपयोग हा बांबू फर्निचर, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्री, क्लाय बोर्ड, बांबू पल्प इत्यादी गोष्टीसाठी केल्या जातो आणि त्याबरोबरच आपल्या भारत देशामध्ये बांबूचं मार्केट सुद्धा खूप मोठा आहे हे जवळपास 26 हजार कोटी एवढ येत. व त्याप्रमाणेच बांबू लागवड हवेतील कार्बन कार्बन डाय-ऑक्साइड प्रमाण कमी करते, त्यामुळे बांबू लागवडी निसर्गाला सुद्धा एक चांगलीच गोष्ट मानल्या जाते.
बांबू लागवड अनुदान किती असते?
बांबू लागवड ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार आहे. आणि त्याबरोबरच 2 वर्षानंतर शेतकऱ्यांना बांबूंचे भरपूर उत्पन्न सुद्धा. बांबू लागवड लागवडीची संधी लक्षात घेता राज्य सरकारने हेक्टरी 7 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. राज्यामधील पर्यावरण संरक्षणाबरोबरच या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व तसेच रोजगार निर्माण होणार आहे. बांबू लागवड योजने करिता जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्यासाठी विहीर उपलब्ध नसेल तर महात्मा गांधी रोजगार हमी या योजनेमधून 4 लाख रुपयाची विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बांबू लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करावे.
- नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजना 3रा हप्ता, 2000 कोटी मंजूर GR पहा, Namo Shetkari Yojana 3nd Installment
- प्रधान मंत्री पीक विमा योजना,2020-2022 नुकसान भरपाई साठी 11 कोटीचा निधी मंजूर, या दिवशी मिळणार विमा ? पिक विमा यादी पहा? Pik Vima
बांबू लागवड योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कळलेच असेल की बांबू लागवड योजनेसाठी 80% अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांबू लागवड योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील, तर ती म्हणजे सर्वप्रथम शेतीचा सातबारा 8अ उतारा त्यानंतर वन प्रमाणपत्र, शेताचा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक, शेतामध्ये विहीर असलेले प्रमाणपत्र, हमीपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला बांबू लागवड योजनेच्या अर्ज करण्यासाठी लागतील.
बांबू लागवडीचे फायदे
शेतकऱ्यांनी जर बांबू लागवड केली तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. त्याबरोबरच बांबू लागवड या प्रजातीचे जीवन चक्र 40 वर्ष ते 100 वर्षे पर्यंत असते, त्यामुळे दरवर्षी बांबू लागवडीची गरज नाही. बांबूला खूपच कमी पाऊस लागतो. इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 50% खर्च कमीच असतो. बांबू लागवडीचे उत्पन्न घेण्यासाठी कोणती सुद्धा जमीन चालते. बांबू लागवडीचे उत्पन्न बद्दल बोलायचे झाल्यास 2 वर्षे सोडून तिसऱ्या वर्षी तुम्हाला बांबूंचे उत्पन्न मिळायला सुरुवात होते. बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींना फायदा मिळतो. बांबू लागवडी पासून बऱ्याच काही गोष्टी साध्य होतात, जसे की फर्निचर, लाकूड, अगरबत्ती, कापड, ऊर्जा. ऊर्जा मध्ये सीएनजी, इथेनॉल, चारकोल त्यामुळे बांबू हा खूपच महत्त्वाचा पीक आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा– https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=nationalbamboomissionapp
2 thoughts on “बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाखाचे अनुदान, राज्यात 10 लाख हेक्टर वर बांबू लागवड होणार , Bamboo Plantation Subsidy”