दुष्काळ निधी 2023, 40 तालुक्यांना किती मिळणार अनुदान? पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Nidhi 2023

Dushkal Nidhi 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना किती आणि कधी दुष्काळी अनुदान मिळणार आहे याबाबत माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेलच की यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या उशिरा पेरण्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जवळपास 30 टक्के उत्पन्न घटलं होतं आणि त्यानंतर ऑगस्ट आणि जुलै मधल्या 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचं 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटलं होतं यामुळे जवळपास 40 तालुक्यांमध्ये ऑक्टोबर 2023 या महिन्यांमध्ये शासनाने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता त्यानंतर या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने एक निधी मान्य केला आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी पडणार आहे याबाबत सर्व शेतकरी वाट पाहत आहेत तर चला मग जाणून घेऊया दुष्काळ निधी 2023 बद्दल सर्व माहिती

दुष्काळ निधी 2023

शेतकरी मित्रांनो जानेवारी 2024 मध्ये शासनाने एक जीआर घोषित केला होता ज्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 2443 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि हा निधी जवळपास 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती या जीआर मध्ये दिली होती यामध्ये नुकसानग्रस्त जिरायती शेतीला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये निधी देण्याचा शासनाने मंजूर केला होता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे बहुवार्षिक पिके आणि फळ पिकांचा समावेश होता अशा शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याचे शासनाने मंजूर केले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत तर हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार याची चिंता सध्या शेतकऱ्यांना लागत आहे

दुष्काळ अनुदान कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सांगण्यात येत होते की दुष्काळ अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्च पर्यंत जमा होणार होते परंतु शासनाने केवायसी च्या याद्या उशिरा गावगावी दिल्यामुळे दुष्काळ अनुदान येण्यास देरी झाली सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवायसी केले आहेत शासनाने या 40 तालुक्यातील महसूल मंडळाकडे केवायसी च्या याद्या पाठवल्या होत्या आणि महसूल मंडळाकडून प्रत्येक गावोगावी या केवायसी याद्या विचारीत केले आहेत यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी करून घेतले आहेत अशा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे पैसे 15 एप्रिल 2024 पर्यंत जमा होणार असल्याने सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या काळजी घेऊ नका तुमच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये दुष्काळ अनुदान चे पैसे जमा होणार आहेत

40 thoughts on “दुष्काळ निधी 2023, 40 तालुक्यांना किती मिळणार अनुदान? पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Nidhi 2023”

Leave a comment