आजचे कापसाचे बाजार भाव, दि.22/03/2024, कापसाचे भाव वाढतील का ?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर मिळाला आहे? त्यासोबतच कापसाचे भाव पुढच्या दोन महिन्यांमध्ये कसे राहणार आहेत? या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला सरासरी दर 7400 रुपये प्रति क्विंटल ते 7800 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कापसाला चक्क 8400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद मावत नव्हता. परंतु कापसाचे दर पुन्हा घसरले आहेत. कापसाचे दर आठवड्याच्या सुरुवातीला अचानक वाढत आहेत आणि आठवड्याच्या शेवटी कापसाचे दर घसरत आहेत. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येणारे परिणाम. त्याबरोबर शेतकऱ्यांना शासनाने कापसाला 7020 रुपये एवढा दर दिला आहे, त्यापेक्षाही हजार रुपयांनी अधिक व्यापारी लोक शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत आहेत. याचे कारण एकच आहे ते म्हणजे पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहे. तर मग चला पाहूया आजचा कापसाचा दर.

पिक विमा , पिकविम्यात मोठे बदल, शेतकऱ्यांना मिळणार एकरी 39,500 रु. पहा कसे, Crop Insurance 2023

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.20/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो कापसाचे दर कधी वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत. यावर शेतकऱ्यांनी लक्ष न देता शेतकऱ्यांनी आपला कापूस कधी विकायचा आहे यावर लक्ष द्यावे. कारण की पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहेत. कारण की बाजारामध्ये कापसाची आवक कमी होत चाललेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि बाहेर देशांमध्ये भारतीय कापसाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण बाहेरील देशांना भारतीय कापूस अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळतो. भारतातील उद्योगांना सुद्धा कापसाचे मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढतील असे दिसून येत आहे.

कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana

बाजार समितीजास्तीत जास्त दर
अमरावती7450 रु.
धारणी6900 रु.
अकोला7800 रु.
अकोला(बोरगावमंजू)7800 रु.
उमरेड7550 रु.
वारोरा-माढेली7700 रु.
परभणी7850 रु.
यावल7190 रु.
हिमायतनगर7450 रु.
सिंधी(सेलू)7730 रु.
फुलंब्री8200 रु.

Cotton Rate Today

Cotton Rate Today
Cotton Rate Today

मित्रांनो वरील टेबल अनुसार तुम्ही पाहिले असेलच की सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर मिळत आहे. मागच्या आठवड्यात परभणी बाजार समितीमध्ये कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता आणि आता फक्त 7850 रुपये झाला आहे. शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये 85% टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे आणि आता फक्त 15% कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कापसाचे आवक बाजार समितीमध्ये कमी होत आहे. महाराष्ट्रातील पूर्ण बाजार समितीमधील व्यापारी लोक चांगला कापूस विकत घेण्यासाठी मरमर करीत आहेत. कारण व्यापारी लोकांना माहित आहे की कापसाचा भाव पुन्हा वाढणार आहे. दिलेल्या माहितीनुसार कापूस तज्ञांच्या मते कापसाचे भाव एप्रिल ते मे महिन्यामध्ये पुन्हा वाढू शकतात, ज्याप्रकारे फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या भावात अचानक 10% ची वाढ झाली होती. त्याचप्रमाणे एप्रिल ते मे महिन्यामध्ये अचानक 5% ची वाढ होणार आहे. म्हणजे कापसाला एप्रिल-मे महिन्यामध्ये जास्तीत जास्त दर 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळू शकतो.

Leave a comment