Kapus Bajar Bhav Today सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कापसाचे दर कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहेत. या आठवड्यामध्ये सुरुवातीला कापसाचे दर अचानक वाढले होते. शेतकऱ्यांना अकोट बाजार समितीमध्ये कापसाला चक्क 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. तर बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला 8000 हजार रुपये पेक्षाही जास्त कापूस भाव मिळत होता. परंतु आज पुन्हा कापूस भाव मध्ये घसरन पाहायला मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त करून कापसाची आवक कमी केलेली आहे. पूर्ण महाराष्ट्र मधून कापसाला सध्या कमी जोर मिळत आहे. कारण की 85 टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. तर चला जाणून घेऊया आजचे कापसाचे भाव.
कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana
आजचे कापसाचे बाजार भाव
मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. शेतकरी मित्रांनो हे गणित लक्षात घ्या की आठवड्याच्या सुरुवातीला कापसाचे भाव अचानक वाढत आहेत आणि आठवड्याच्या शेवटीला कापसाचे भाव कमी होत आहेत. मागच्या महिन्यापासून हा प्रकार सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये सुरू आहे. एवढे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपला कापूस विकावा तर मग आजचा पाहूया बाजार भाव.
बाजार समिती | जास्तीत जास्त भाव |
अमरावती | 7500 रु. |
राळेगाव | 7605 रु. |
घनसावंगी | 7800 रु. |
जामनेर | 7200 रु. |
घाटंजी | 7400 रु. |
अकोला | 7680 रु. |
अकोला(बोरगावमंजू) | 8000 रु. |
देऊळगाव राजा | 7870 रु. |
काटोल | 7400 रु. |
सिंधी(सेलू) | 7765 रु. |
Cotton Rate Today
वरील टेबल अनुसार आपण सर्व जिल्ह्यातील कापसाचे बाजार भाव पाहिले आहेत. तुम्हाला कळालेच असेल की या हप्त्याच्या सुरुवातीला कापसाचे भाव अचानक वाढली होती आणि हप्त्याच्या शेवटीला पुन्हा कापसाचे भाव कमी होत आहे. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा हाच प्रकार घडला होता. म्हणून शेतकऱ्यांनो जर तुम्हाला कापूस विकायचा असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी कापूस विकण्याचा प्रयत्न करा. कारण की आठवड्याच्या सुरुवातीला कापसाचे भाव वाढत आहे. तर आठवड्याच्या शेवटला कापसाचे भाव कमी होत आहेत. याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. सध्या व्यापारी लोक हमीभावापेक्षा जास्त पैशाने कापूस भाव विकत घेत आहेत आणि महाराष्ट्र मध्ये कापसाला सध्या सरासरी 7300 रुपये प्रतिक्विंटल हे 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस विचार करून विकावा.
पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.21/03/2024, कापसाचे भाव पुन्हा घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”