Kusum solar yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत खोटे मेसेज आलेले आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आता या मेसेज द्वारे नवीन ॲप्लिकेशन, नवीन फॉर्म आणि जास्तीचे पेमेंट ऑप्शन येत आहे जे पहिल्यापेक्षा जास्त दाखवत आहे, त्यामुळे येथे खूप मोठा संशय निर्माण होत आहे की हे फेक मेसेज आहेत का? तर मित्रांनो सध्या मार्केटमध्ये असे बरेच सायबर क्राईम करणारे लोक बसले आहेत जे कुसुम सोलर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खोटे एसएमएस पाठवून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहेत. त्यामुळे ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आहे. तर तुम्हालाही असे खोटे एसएमएस आले असतील तर सावधान रहा आणि अजिबात पेमेंट करू नका. तर मग चला जाणून घेऊया खोटे एसएमएस कसे येतात आणि ते कसे ओळखायचे. त्याबरोबरच कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पेमेंट कसे करायचे आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत.
Kusum solar Pump yojana – कुसुम सोलर पंप योजना
शेतकरी मित्रांनो तर कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत तुम्हाला पेमेंटचे मेसेज आले असतील किंवा सर्वे करण्याचे मेसेज आले असतील तर अतिशय सावध रहा. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की खोटे मेसेज कसे ओळखायचे आणि तुम्हाला खरंच पेमेंट आणि सर्वे करण्याचं ऑप्शन जर आला असेल तर ते कसं ओळखायचं.
पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023
कुसुम सोलर पंप योजना खोटे एसएमएस?
तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खोटे कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत मेसेज आले असतील तर ते कसे ओळखायचे तर, त्यासाठी सर्वप्रथम त्या एसएमएस मध्ये जायचं आणि त्या एसएमएस मधल्या लिंक वरती क्लिक करायचं जर या एसएमएस द्वारे जर MEDA एप्लीकेशन न उघडता दुसरे कोणते ॲप्लिकेशन उघडले तर ओळखून जायचं की हा खोटा एसएमएस आहे.
कुसुम सोलर पंप योजना पेमेंट कसे करायचे?
जर तुम्हाला कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पेमेंट आणि सर्वे करण्याचे ऑप्शन आले असतील तर सर्वप्रथम तुम्ही MEDA चे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करायचे आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज निवडण्याचं ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करून तुमचा अर्ज तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्ही किती HP चा पंप ऑर्डर केला आहे, त्यानंतर तुमचं नाव, पत्ता फोन नंबर या सर्व गोष्टी त्या फॉर्ममध्ये येऊन जातील आणि त्याच्या खालीच सर्वे करण्याचे ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्ही शेतामध्ये जाऊन आपला मोबाईल द्वारे सर्वे करून घ्यायचा आहे. त्याच्या काही दिवसानंतरच तुम्हाला या MEDA ॲप्लिकेशन वरती ज्याप्रमाणे सर्वे करण्याचे ऑप्शन आले होते त्याच ठिकाणी पेमेंटचे सुद्धा ऑप्शन येईल आणि मग तुम्ही पेमेंट करण्यास पात्र होतात. पेमेंट केल्यावर काही दिवसानंतर तुमच्या गावातील एक लाईन मेन आणि सोलर पंप कंपनीच्या अधिकारी तुमच्या शेतामध्ये येऊन विहिरीची किंवा बोरची पाहणी करेल आणि त्यानंतर तुमच्या सोलार पंप इन्स्टॉलेशन आहे
2 thoughts on “कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana”