आजचे कापसाचे बाजार भाव, दि.17/03/2024, कापसाचे भाव वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव दिवसेंदिवस कधी चढत आहेत तर कधी उतरत आहेत. परंतु आपण मागच्या दोन हप्त्यापासून कापसाचे भाव हे अगदी स्थिर झालेली आहे. राज्यांमध्ये अशा पण काही बाजार समिती आहेत जिथे कापसाला सर्वोच्च भाव मिळत आहे. जसे की परभणी येथील बाजार समितीमध्ये 8300 रुपये प्रतिक्विंटल, त्यानंतर 15 मार्च रोजी हिंगा बाजार समितीमध्ये कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर झाला होता आणि अकोट येथे 8285 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मागे मिळत होता. कापसाचा दर हा 8300 च्या पुढे जाईना झालाय त्यामुळे बरेच शेतकरी परेशान झाले आहेत. तर मित्रांनो कापसाचे दर हे पुढच्या दोन महिन्यांमध्ये कसे राहतील याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि तसेच आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर लागला? कोणती बाजार समिती कापसाला सर्वोच्च दर देत आहे? ते आपण आज पाहणार आहोत.

पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार?, 20 जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील सर्व मार्केट कमिटी मध्ये कापसाला सरासरी दर हे 7500 रुपये प्रति क्विंटल ते 7700 रुपये प्रति क्विंटल एवढे मिळत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाला चांगला दर मिळतो म्हणून कापूस विकून टाकला आहे. यामध्ये सध्या ८५% कापूस शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. आता फक्त 15% ते 20% टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कापसाची आवक मार्केट कमिटी मध्ये कमी होत चाललेली आहे. हे सुद्धा कारण आहे की कापसाचे दर पुढील काळात वाढतील. तर मग चला आजचा बघूया मार्केट भाव.

किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana

बाजार समितीजास्तीत जास्त दर
अमरावती7500 रु.
मारेगाव7750 रु.
अकोला7980 रु.
अकोला (बोरगावमंजू)8180 रु.
उमरेड7680 रु.
देऊळगाव राजा7950 रु.
मांडलं7500 रु.
हिंगा8300 रु. (15/03/2024)
यावल7180 रु.
हिमायंतनगर7600 रु.
सिंधी(सेलू)7820 रु.
फुलंब्री7400 रु.
हिंगा7300 रु.
परभणी8000 रु.

Cotton Rate Today

Cotton Rate Today
Cotton Rate Today

तर मित्रांनो जसे की आपण वरच्या टेबल मध्ये पाहिले की कोणत्या बाजार समितीमधील कापसाला सर्वोच्च दर मिळत आहे. वरच्या टेबल नुसार आजचे कापसाचे भाव हे स्थिर झालेले दिसून येत आहेत. मागच्या दोन हफ्त्यापासून कापसाचे भाव अचानक वाढत आहेत तर कधी अचानक कमी होत आहेत. परंतु कापसाला जास्तीत जास्त 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर भेटलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडत आहेत की कापसाला भाव वाढेल का नाही? वाढणार तर कधी वाढणार? तर शेतकरी मित्रांनो कापसाचे वाढणार आहे. परंतु या गोष्टीला वेळ आहे. कापसाचे दर हे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये अजून 5% टक्क्यांनी वाढणार असल्याचे दावे कापूस अभ्यासात तज्ञांनी दिली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे त्यांनी थोडी वाट पहावी. नाहीतर आपला कापूस विकून टाकावा. ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यांमध्ये कापूस भावात अचानक 10% टक्क्याने वाढ झाली होती. त्याचप्रमाणे येत्या दोन महिन्यांमध्ये कापूस भावात अचानक 5% टक्क्यांनी वाढ होणार आहे. सध्या मार्केटमध्ये कापसाला जास्तीत जास्त 8300 रुपये दर मिळत आहे. ज्या दिवशी 5% वाढ होईल, त्या दिवशी मार्केटमध्ये कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळेल.

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, पिक विमा कधी मिळणार, जिल्ह्यानुसार यादी पहा, Crop Insurance 2023

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra