Pik Vima 2023 शेतकऱ्यांसाठी खूपच अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आता 75 टक्के पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. या 20 जिल्ह्यातील जवळपास 55 लाख 12 हजार शेतकरी पात्र आहेत. ज्यांच्यासाठी राज्य सरकारने 1013 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो 20 जिल्हे कोणते असतील? आणि त्याचबरोबर या 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75 टक्के पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आहे? हे आपण सर्व काही या लेखांमध्ये पाहणार आहोत. तरीपण आपण सर्व माहिती वाचून घ्यावी जेणेकरून तुम्हाला 75 टक्के पीक विमा बाबत सर्व काही माहिती कळेल.
75% पिक विमा कधी मिळणार?
शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा 15 मार्च 2024 पासून मिळायला सुरू होणार आहे. हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान भरपाई करिता पिक विमा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 21000 रुपये दिल्या जाणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा भेटणार नाही त्यामुळे खालची सर्व माहिती वाचून घ्या.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.15/03/2024, कापसाचे भाव पुन्हा चढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो 75 टक्के पीक मिळण्यासाठी शासनाने खूप मोठी चिंता व्यक्त केली आहे. कारण नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास सक्त मनाई करीत आहेत. कारण विमा कंपन्यांच्या मते ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा भरलेला होता आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी ई-पीक पाहणी केली आणि शेवटचे सर्वात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न नुकसानीमुळे घटलं होतं अशा शेतकऱ्यांना फक्त पिक विमा दिल्या जाणार आहे. बाकी शेतकऱ्यांना विमा कंपन्या पिक विमा पोटी 25% रक्कम देण्याकरिता नकार देत आहेत. यादी चिंता राज्य शासनाने देखील व्यक्त केली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana
75% पिक विमा जिल्ह्यांची यादी
शेतकरी मित्रांनो 75 टक्के पीक विमा करिता शेतकऱ्यांसाठी 1013 कोटी रुपयांचं पॅकेज शासनाने मंजूर केलेला आहे. या दुसऱ्या टप्प्याकरिता आता संपूर्ण प्रक्रिया झाली असून यासाठी 20 जिल्हे पात्र करण्यात आले आहेत. हे वाटप 15 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. खाली दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा मिळणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना 21 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 55 लाख 12 हजार एवढे शेतकरी पात्र आहेत. हा पिक विम्याचा दुसरा टप्पा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटला जाणार आहे ते सर्व जिल्हे खाली दिले आहेत.
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra
अनु.क्र | दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे |
1. | धाराशिव |
2. | अकोला |
3. | कोल्हापूर |
4. | जालना |
5. | परभणी |
6. | नागपूर |
7. | लातूर |
8. | अमरावती |
9. | नाशिक |
10. | जळगाव |
11. | अहमदनगर |
12. | सोलापूर |
13. | सातारा |
14. | सांगली |
15. | बीड |
16. | छत्रपती संभाजी नगर |
17. | धुळे |
18. | यवतमाळ |
19. | वाशिम |
20. | पुणे |
पिक विमा 2023
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये एक रू. भरून आपला पिक विमा नोंदवला होता. त्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि विमा कंपन्या मार्फत पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील 16 जिल्ह्यातील 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची तब्बल 965 कोटी एवढा निधी जमा करण्यात आलेला आहे. यामध्ये खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या भात, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नाचणी, उडी, मूग, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा यांचे नुकसान झाले असतील तर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment
शेतकरी मित्रांनो पिक विमा वाटप करण्याकरिता विमा कंपन्यांनी 21 जिल्ह्यांचा आक्षेप घेतला होता परंतु त्यांनी ही मागणी नाकारली असून फक्त आता 9 जिल्ह्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठांनी सांगितलेला आहे. पिक विमा कंपन्यांच्या मते जर जिल्ह्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडला असेल, पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ बरोबर झाली नसेल त्याबरोबरच अतिवृष्टी दुष्काळ यामुळे जर पिकांचे नुकसान झाले असेल तर विमा रकमेपैकी 25 टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यास देण्यात बंधनकारक आहे. या सर्व गोष्टी नुकसान भरपाई मुळे झाले असतील तर एका ठराविक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते पिक विम्याच्या स्वरूपात.
1 thought on “पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार?, 20 जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023”