Namo Shetkari Yojana 4th installment शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिकी 6000 हजार रुपये राज्य सरकारकडून दिल्या जात आहेत. ज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता आणि त्याबरोबरच पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. ज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये मिळाला आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार आहे? असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे याबद्दल सर्व माहिती खाली दिली आहे. ती तुम्ही वाचून घ्यावी.
नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत आतापर्यंत राज्य शासनाने अधिकृत माहिती दिलेली नाहीये. परंतु मीडिया रिपोर्ट अनुसार नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै च्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे, कारण पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो. नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटी जमा झाला, ज्यामुळे असा अंदाज येतो की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.15/03/2024, कापसाचे भाव पुन्हा चढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today
पिक विमा 2024, पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024
नमो शेतकरी योजना अपडेट
29 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला गेला होता. यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांपैकी 88 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला होता. या दोन हप्त्यासाठी शासनाने 3792 कोटी एवढा निधी मंजूर केला होता. ज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना नमो योजनेचे पैसे म्हणजे 4000 हजार रुपये मार्च महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यांमध्ये जमा होत आहेत. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी वेळोवेळी e-kyc केल्या नव्हत्या, त्याच बरोबर आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घेतलेली नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड शेडिंग करून घेतलेलं नव्हतं. यामुळे शेतकऱ्यांना नमो योजनेचे 2 हप्ते उशिरा मिळाले. आता नमो योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या हप्त्यांमध्ये वितरित केला जाईल.
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra
1 thought on “नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment”