आजचे कापसाचे बाजार भाव, दि.15/03/2024, कापसाचे भाव पुन्हा चढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today शेतकरी मित्रांनो कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. याची कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेली मागणी होय. शेतकरी मित्रांनो भारतीय कापूस सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सस्ता दरामध्ये विकल्या जातो. त्यामुळे भारतीय कापसाला बाहेरील देशांमध्ये बरीच मागणी आहे. सध्या अमेरिकेतील शेतकऱ्यांनी 85% टक्के कापूस विकलेला आहे आणि आता फक्त अमेरिकेतील शेतकऱ्यांकडे 15 % ते 18% कापूस शिल्लक आहे. जर भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोललं जावं तर सर्वात जास्त कापसाचे उत्पन्न हे महाराष्ट्र मध्ये घेतल जाते. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ नंबर एकला आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा 80% ते 82% टक्के कापूस विकला आहे. आता फक्त शेतकऱ्यांकडे 18% ते 20% टक्के कापूस शिल्लक आहे. याच गोष्टीमुळे कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आज आपण पाहणार आहोत की पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर हे कसे राहणार आहेत आणि आज कापसाला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये किती दर भेटला आहे. या सर्व गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? नमो शेतकरी दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता कधी मिळणार? Installment of Namo Farmer Scheme

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

मित्रांनो वरील माहिती अनुसार तुम्हाला समजलं असेल की सध्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी होत चाललेली आहे आणि कापूस बाजार भाव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर हे 7500 रुपये प्रति क्विंटल ते 7800 रुपये प्रति क्विंटल एवढे मिळत आहेत आणि कापसाला जास्तीत जास्त दर हे 8200 रुपये प्रति क्विंटल एवढे मिळत आहेत. काल परभणी येथील बाजार समितीमध्ये कापसाला 8300 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर भेटला होता. त्यामुळे कापसाचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत शेतकऱ्यांनी होईल तेवढा आपला कापूस एप्रिल ते मे महिन्यामध्ये विकण्याचा प्रयत्न करावा. कारण या दोन महिन्यांमध्ये बाजार समितीमध्ये कापसाची आवक संपूर्णपणे कमी होणार आहे आणि 100% टक्के कापसाचे दर वाढणार आहेत.

पिक विमा 2024, पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

बाजार समितीजास्तीत जास्त दर
नरखेड7350 रु.
हिमायतनगर7600 रु.
हिंगणा7400 रु.
परभणी8300 रु. (14/03/2024)
काटोल7500 रु.
मानवत8100 रु.
आखाडाबाळापूर7400 रु.
वारोरा-माढेली7850 रु.
देऊळगाव राजा8100 रु.
उमरेड7760 रु.
अकोला (बोरगावमंजू)8200 रु.
अकोला7621 रु.
पारशिवनी7500 रु.
मारेगाव7750 रु.
भद्रावती7750 रु.
अमरावती7650 रु.

Cotton Rate Today

Cotton Rate Today
Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो वरील टेबल मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे कापसाचे जास्तीत जास्त दर आम्ही दिले आहेत. ते तुम्ही वाचून घेतलेत असेल. आता तुम्हाला समजला असेल की कापसाचा दर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस होईल तेवढा उशिरा विकण्याचा प्रयत्न करा. कारण पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहेत. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यातली त्यात भारतीय उद्योगांमध्ये सुद्धा कापसाचे टंचाई भासत आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल दर होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढी वाट बघावी. कापसाचे भाव 100% टक्के वाढणारच आहेत असे अंदाज बऱ्याच कापूस अभ्यासात तज्ञांनी लावलेली आहेत. त्यामुळे कापूस विकताना विचार करून विकावा आणि सध्या महाराष्ट्र मध्ये 4 अशा बाजार समिती आहे तेथे कापसाला सर्वोच्च दर मिळत आहे. त्या बाजार समिती म्हणजे परभणी, मानवत, देऊळगाव राजा, अकोला, अकोला(बोरगावमंजू) शेतकऱ्यांना या तीन-चार बाजार समिती आशा आहे येथे कापसाला सर्वोच्च भाव लागत आहे.