मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून मागील त्याला सोलर पंप ही योजना घोषित करण्यात आली होती. आणि याच अंतर्गत राज्य शासनाने साडेआठ(8.5 lakh) लाख सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये एक नवीन शासन निर्णय काल 13 मार्च 2012 रोजी सादर केला आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळांनी एक निर्णय घेतला आहे या निर्णयांमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षांमध्ये पाच लाख सोलर पंप वितरित होतील. असे काही निर्णय राज्य शासनाने घेतली आहे. तर चला मग पाहूया 13 मार्च रोजी च्या मंत्रिमंडळामध्ये मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी काय घोषणा केली आहे आणि हे सोलार पंप शेतकऱ्यांना कधी मिळतील.

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024

मित्रांनो सध्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवल्या जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना पाच वर्षांमध्ये पाच लाख सौर कृषी पंप मिळावे याकरिता कृषीवाहिनीचे सौर ऊर्जा करण्यासाठी एआयआयबी(AIIB) बँकेकडून कर्ज घेण्यास 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाद्वारे सौर कृषी पंपाचे वितरण महावितरण द्वारे करण्यात येणार आहे.

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024

त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत पहिल्या घटकासाठी 13 हजार 493.56 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि दुसऱ्या घटकासाठी 1 हजार 545.25 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात हे दोन्ही निधी मिळून 15 हजार 39 कोटी एवढा या प्रकल्पामध्ये खर्च येणार असल्याचे निर्णयामध्ये घोषित केले आहे. ज्यामध्ये या योजनेसाठी 60 टक्के रक्कम म्हणजे 9 हजार 20 कोटी एवढा निधी AIIB बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात महावितरण कंपनीत वितरित करण्यात येणार आहे आणि उरलेले 4 हजार ८१७.९७ कोटी एवढा निधी राज्य शासन महावितरण कंपनीला अनुदान स्वरूपात 2024 ते 2028 वर्षात देणार आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षांमध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे सोलर पंप होतील अशी आशा आहे.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.14/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

आजचे तुरीचे बाजार भाव 2024, दि.11/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, तुरीचे आजचे भाव 2024 महाराष्ट्र, Tur Bajar Bhav Today

शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार?

कुसुम सोलर पंप योजना 2024
कुसुम सोलर पंप योजना 2024

शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे. सध्या राज्यामध्ये अवेळी वीज पुरवठा असल्यामुळे शेतकरी योग्यरीत्या शेतीला सिंचन करू शकत नाहीत. यामुळे शासनाने कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी एडीबी(ADB) या बँकेकडून कर्ज घेतले आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना गावोगावी दिवसा आणि रात्री या दोन्ही वेळी वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची जे काही जुने ट्रान्सफॉर्मर असतील त्यांच्यामध्ये बदल केले जातील आणि वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि क्षमता वाढेल यासाठी शासनाने एडीबी बँकेकडून 8 हजार 109 कोटी एवढ कर्ज घेतलेले आहे आणि या कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीच्या सक्षमीकरणासाठी जवळपास 11 हजार 585 कोटी एवढा खर्च लागणार आहे.

2 thoughts on “मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra”

Leave a comment