आजचे तुरीचे बाजार भाव 2024, दि.11/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, तुरीचे आजचे भाव 2024 महाराष्ट्र, Tur Bajar Bhav Today

Tur Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या तुरीच्या बाजारभावामध्ये. आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यानुसार कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वोच्च भाव लागला आहे. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की सध्या तुरीची आवक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे तुरीचे भाव हे सध्या स्थिर आहेत. सध्या तुरीला महाराष्ट्रामध्ये सरासरी दर हा 9500 रुपये क्विंटल ते 9800 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. तुरीचा जास्तीत जास्त दर हा 10600 रुपये प्रतिक्विंटल वरती गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असे वाटत आहे की तुरीचे भाव हे कधी 11000 रुपये होतात. कारण यंदाच्या खरीप हंगामामध्ये तूर, सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यंदा पडलेल्या दुष्काळातून ते अवकाळी पाऊस गारपीट मधून या तुरीच्या पिकाला शेतकऱ्यांनी सांभाळल आहे. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. तर मग चला पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वोच्च भाव लागला आणि येत्या दोन महिन्यांमध्ये तुरीचे भाव कसे राहते ते पाहूया.

आजचे तुरीचे बाजार भाव 2024

आजचे तुरीचे बाजार भाव 2024
आजचे तुरीचे बाजार भाव 2024

तर चला मित्रांनो आजचे तुरीचे भाव पाहूया! संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या बाजार समिती तुरीला सर्वोच्च भाव देत आहे हे आपण खालच्या टेबल मध्ये संपूर्णपणे माहिती दिली आहे, ती तुम्ही सर्व व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्यानंतर आपली तुर कुठे विकायची हे ठरवायचं. शेतकऱ्यांनो सध्या तुरीला जास्तीत जास्त 10600 रुपये दर लागत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पैसे आहेत अशाच शेतकऱ्यांनी जास्त गडबड करू नये. पण ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीयेत त्या शेतकऱ्यांनी लगेच तूर विकून टाकावी. कारण येत्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा तुरीचे भाव वाढणार आहेत. म्हणजे होईल तेवढे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर विकली तर खूपच चांगलं होईल.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.14/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

बाजार समिती जास्तीत जास्त दर
बार्शी वैराग9500
राहुरी बांबोरी9600
पैठण9241
भोकर9625
कारंजा10195
बोदवड10400
हिंगोली10400
मुरूम10303
जामनेर9700
जालना9901
अकोला10470
अमरावती10300
धुळे8850
जळगाव9200
मालेगाव9490
चिखली10400
चाळीसगाव9270
हिंगोली खाणेगाव नाका9800
जिंतूर9750
मलकापूर10555
दिग्रस9845
परतुर9400
गंगाखेड9300
चांदुर बाजार10360
मेहकर9800
नांदगाव9300
निलंगा10000
औराद शहाजानी10225
मुखेड9850
तुळजापूर10000
सेनगाव9700
ताडकळस9500
दुधनी10405
बोरी9350
लाखन्दूर9000
काटोल9925
पाथर्डी9600
जालना10295
बार्शी9600
छत्रपती संभाजीनगर9675
शेवगाव9350
करमाळा9500
देवराई9750
परतुर9350
देऊळगाव राजा9400
गंगापूर9200
औराद शहाजानी10281
तुळजापूर10000
देवळा8445
सोनपेठ9551

Tur Bajar Bhav Today

Tur Bajar Bhav Today
Tur Bajar Bhav Today

यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या उशिरा प्रेरणा झाल्या आणि जुलै ते ऑगस्ट मध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचे कालखंडाने शेतकऱ्याचे 50 टक्के पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घटले. त्यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस मुख्य पिके होती. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांवर फार जास्त परिणाम झाला. ज्यामध्ये या दोन पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटले ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा काढला होता त्यांना सध्या 75% पिक विमा 11 मार्चपासून (पिक विमा 2023) वाटप सुरू केलेली आहे आणि त्यानंतर तुरी बद्दल बोलायचे झाल्यास शेतकऱ्यांनी तुरीला खरच लहान लेकराप्रमाणे जपलं आणि पुन्हा दिवाळीनंतर राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तुरीचे 30 टक्के उत्पन्न घटल आणि आता शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये आली तर तिला सर्वोच्च भाव भेटत नाहीये. त्यामुळे शेतकरी खूप नाराज आहे. परंतु शेतकऱ्यांना येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये तुरीचे पुन्हा भाव वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय तुरीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

नुकसान भरपाई 2023, अतिवृष्टी अनुदान यादी 2023 मंजूर, लवकर यादी पहा, Flood Compensation 2023

रेशन कार्ड धारकांना खुशखबर, गुढीपाडव्यानिमित्त या वस्तू मोफत मिळणार, Aandacha Shida April 2024

1 thought on “आजचे तुरीचे बाजार भाव 2024, दि.11/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, तुरीचे आजचे भाव 2024 महाराष्ट्र, Tur Bajar Bhav Today”

Leave a comment