Kapus Bajar Bhav Today कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो कापसाचे भाव पुन्हा वाढलेली आहेत. आतापर्यंत कापसाचे भाव इतके वर कधीच नाही गेले. आज अचानक कापसामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. शेतकरी मित्रांनो परभणी बाजार समितीमध्ये कापसाला चक्क 8300 रुपये प्रतिक्विंटल भाव भेटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या श्वासात श्वास घेतलेला आहे. मित्रांनो मागील काही दिवसापासून परभणी, मानवत, देऊळगाव राजा, अकोट आणि अकोला या बाजार समितीमध्ये कापसाचे दर हे जास्तीत जास्त 8000 रुपये क्विंटल ते 8200 रुपये प्रति क्विंटल इतक्यावर जाऊ लागले. परंतु आज कापसाचा विक्रम मोडलेला आहे. परभणी येथे आज चक्क कापसाला 8300 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर भेटलेला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. शेतकऱ्यांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे हळूहळू कापसाचे दर वाढत चाललेले आहेत. एप्रिल ते मे महिन्यामध्ये पुन्हा कापसाचे दर हे 5% टक्क्यांनी वाढणार आहे. तर मग चला जाणून घेऊया कापसाची दरवाढ कशी होणार आहे आणि आज कापसाला महाराष्ट्र मध्ये किती दर लागला.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील 80% ते 82% टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त शेतकऱ्यांकडे 18% ते 20% टक्के कापूस शिल्लक आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि दरवाढ ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या घरामध्ये कापूस आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस विकायची घाई करू नये. कारण की येत्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा उंच होणार आहे. तर मग चला पाहूया आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर लागली? अगदी बाजार समिती नुसार!
नुकसान भरपाई 2023, अतिवृष्टी अनुदान यादी 2023 मंजूर, लवकर यादी पहा, Flood Compensation 2023
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7600 रु. |
मारेगाव | 7775 रु. |
अकोला | 7800 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8200 रु. |
उमरखेड | 7800 रु. |
देऊळगाव राजा | 8000 रु. |
काटोल | 7400 रु. |
परभणी | 8300 रु. |
सिंधी(सेलू) | 7940 रु. |
फुलंब्री | 7200 रु. |
पारशिवनी | 7400 रु. |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो आपण वरी सर्व बाजार समितीचे कापूस भाव पाहिजे आहेत. तर कापूस भाव भविष्यामध्ये म्हणजे येत्या दोन-तीन महिन्यामध्ये कसा राहणार आहे याबद्दल बोलूया. तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसामध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर कापसाला सरासरी दर हे 6000 रुपये प्रतिक्विंटल ते 6500 रुपये प्रति क्विंटल एवढे मिळत होते. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये अचानक कापसामध्ये 10% टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर कापसामध्ये हळूहळू तेजी पाहायला मिळाली.
परभणी, मानवत, सेलू, अकोला, देऊळगाव राजा, अकोट असा बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला 8000 पेक्षा जास्त प्रतिक्विंटल दर भेटायला लागले आणि आज परभणी बाजार समितीमध्ये कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर भेटाला आहे. आता शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की येत्या दोन-तीन महिन्या महिन्यामध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढतील का? तर हो मित्रांनो! एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पुन्हा कापसाच्या भावामध्ये 5% टक्क्याने वाढ होणार आहे. असे बऱ्याच कापूस अभ्यासात तज्ञांनी आपल्या अंदाजानुसार सांगितलेले आहे. कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आपल्या भारतातील कापूस हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी स्वस्त दरामध्ये विकला जातो. त्यामुळे भारतीय कापसाला बाहेरील देशांमध्ये खूप मागणी आहे आणि भारतीय उद्योगांमध्ये सुद्धा कापसाला बऱ्याच प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तर कापूस विकू नये.
3 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.14/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”