Heavy Rain Grant List 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखामध्ये. शेतकरी मित्रांनो 2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळाले आहे. उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उशिरा पेरण्या झाल्या, त्यानंतर जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता त्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रेशन कार्ड धारकांना खुशखबर, गुढीपाडव्यानिमित्त या वस्तू मोफत मिळणार, Aandacha Shida April 2024
त्यामध्ये कापूस असेल तूर असेल आणि सोयाबीन असेल या पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे नुकसान पाहता नाशिक, नागपूर आणि पुणे विभागाने महाराष्ट्र राज्य शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव मांडले आणि त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी शासनाने नाशिक, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या 4 अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 2400 कोटी 67 लाख 27 हजार एवढा निधी मंजूर केला. तर मग चला या नुकसान भरपाईचे पैसे
शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहे याबाबत थोडी चर्चा करू या.
अतिवृष्टी अनुदान यादी 2023
शेतकरी मित्रांनो जर राज्यांमध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीट झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर ही नुकसान भरपाई काढण्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एक अनुदान दिले जाते. हे अनुदान राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून दिल्या जाते. 11 नोव्हेंबर 2023 च्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये नाशिक नागपूर भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता विभागीय आयुक्त नागपूर आणि नाशिक यांच्याकडून नुकसान भरपाई निधी मागण्याचे शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामुळे शासनाने या चार जिल्ह्यांकरिता 2400 कोटी 67 लाख 27 हजार एवढा निधी मंजूर केला आहे. त्याची सर्व माहिती खालील टेबल मध्ये दिली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता.
Sr.No | जिल्हा | बाधित शेतकरी संख्या | मंजूर निधी |
1) | नाशिक | 52 | 4.70 कोटी |
2) | भंडारा | 5388 | 589.65 कोटी |
3) | नागपूर | 4432 | 664.18 कोटी |
4) | गोंदिया | 0 | 1208.84 कोटी |
अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी
शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने एक नवीन जीआर सादर केला आहे. ज्यामध्ये डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. यामध्ये राज्य शासनाने तब्बल 2400 कोटी 67 लाख 27 हजार एवढा निधी मंजूर केला आहे, या नुकसान भरपाई मुळे जवळपास दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी बाधित झाली होती. ज्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना 11 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये नुकसान भरपाई चे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये ते 28 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना 2 हेक्टर एवजी 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून भेटली आहे.
पिक विमा 2024, 75% पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024
1 thought on “अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, अतिवृष्टी अनुदान यादी 2023, पात्र शेतकऱ्यांची यादी, Heavy Rain Grant List 2023”