Aandacha Shida April 2024 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. तर राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना अत्यंत खुशखबर आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना मोफत वस्तू मिळणार आहेत, त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दल आपण सर्व काही बोलणार आहोत. मित्रांनो राज्यात गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदि सणा निमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेकरिता शासनाने चक्क 550 कोटी 57 लाख एवढा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये जवळपास 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिदा मिळणार आहे, तर मग चला रेशन कार्डधारकांना कोणत्या कोणत्या वस्तू अगदी मोफत मिळणार आहेत त्या सर्व गोष्टी आपण लेखांमधून जाणून घेऊया.
आनंदाचा शिधा एप्रिल 2024
तर मित्रांनो राज्यांमध्ये ज्या लाभार्थ्यांकडे केशरी राशन कार्ड अशा लाभार्थ्यांना 15 एप्रिल 2024 या तारखेनंतर जवळच्या रेशन दुकानांमध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक किलो सोयाबीन तेल हे आनंदाचा शिधामार्फत मिळणार आहे. अगदी मोफत यासाठी तुमच्याकडे केशरी राशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे आणि ही योजना एप्रिल 15 तारखेच्या नंतर राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. ही योजना फक्त गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सुरू केली आहे तुम्हाला अगदी मोफत पणे या चार वस्तू मिळणार आहेत.
पिक विमा 2024, 75% पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024
गुढीपाडवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा
तर मित्रांनो या निर्णयानुसार योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केसरी शेतकरी शिधापत्रिकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
राज्यातील सुमारे 25 लक्ष अन्न योजना 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा शासन निर्णय 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे.
1 thought on “रेशन कार्ड धारकांना खुशखबर, गुढीपाडव्यानिमित्त या वस्तू मोफत मिळणार, Aandacha Shida April 2024”