Sambhajinagar Unseasonal Rain Compensation 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. तर शेतकरी मित्रांनो संभाजीनगर येथील गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जे काही नुकसान झाले होते त्यासाठी शासनाने चक्क 206 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो या नुकसान भरपाईसाठी संभाजीनगर मधील 2 लाख 64 हजार शेतकरी पात्र आहेत आणि या अवकाळी पावसाच्या गारपिटीमुळे तब्बल दीड लाख हेक्टर हे बाधित झाली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. ज्यामध्ये शेतकऱ्यांची बहुवार्षिक पीक, जिरायती पिके आणि फळ पिके यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागले होते. परंतु आता अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यामध्ये 11 मार्चपासून जमा होण्यास सुरू झालेले आहे आणि 31 मार्च पर्यंत ही नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये ते 24 हजार रुपयांचा अनुदान मिळणार आहे. तर या अवकाळी पाऊस नुकसान भरपाई साठी कोणते कोणते तालुके पात्र आहेत आणि तालुक्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत याबद्दल आपण सर्व काही माहिती खाली दिलेली आहे. ती आपण सर्वांनी वाचून घ्यावी.
नुकसान भरपाई 2023
शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. ज्यामध्ये पिकांच्या मदत करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अवकाळी नुकसान झालेल्या 1 लाख 48 हजार 368 हेक्टर वरील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल शासनाने 206 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या नुकसान भरपाईसाठी 2 लाख 64 हजार 194 शेतकरी पात्र आहेत. संभाजीनगर मध्ये कोणते कोणते तालुके या नुकसान भरपाई साठी निवडले आहेत हे तुम्ही खाली वाचू शकता.
संभाजीनगर नुकसान भरपाई 2023
मागच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पंचनामे केली आणि मदतीची मागणी सुद्धा केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी 206 कोटींचा निधी संभाजीनगर जिल्ह्याला मंजूर करण्यात आला. आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार जिरायती, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाई करिता ही रक्कम वाटली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो खाली तालुक्यानुसार मंजूर निधी आणि शेतकऱ्यांची यादी दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्यावी.
तालुक्याचे नाव | बाधित शेतकरी | मंजूर निधी |
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण | 157 | 4345560 |
गंगापूर | 76437 | 747488400 |
खुलताबाद | 31929 | 2651133400 |
कन्नड | 92064 | 637646400 |
सिल्लोड | 61680 | 374734400 |
शेवगाव | 1767 | 30730000 |
1 thought on “नुकसान भरपाई 2023, या जिल्ह्यासाठी 206 कोटीचा निधी मंजूर, शेतकऱ्यांची यादी पहा, Sambhajinagar Unseasonal Rain Compensation 2023”