OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांची स्कॉलरशिप, तुम्ही पात्र आहात का? पहा लवकर, Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 सर्व ओबीसी मित्रांचे स्वागत आहे. तर मित्रांनो जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये मोडत असाल आणि तुमचे सध्या उच्च शिक्षण चालू असेल तर तुम्हाला एक जबरदस्त योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 60 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे. या योजनेमध्ये कोणते कोणते विद्यार्थी पात्र असतील? त्यांची पात्रता काय असेल? त्यांचे शिक्षणाचे निकष काय असतील? आणि त्यांना वार्षिक किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे? याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कोठे करायचा आणि अर्जासाठी कोणती कागदपत्र महत्त्वाचे आहेत? याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत.

ओबीसी विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार
ओबीसी विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024

विद्यार्थी मित्रांनो ही योजना इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या म्हणजे कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे इंजिनिअरिंग साठी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर गेले असावेत या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे 11 मार्च 2024 रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी 60 हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळत आहे.

मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 याप्रमाणे संपूर्ण 21 हजार 600 विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा निर्णय 13 नोव्हेंबर 2023 रोजी मान्य करण्यात आला होता.

ओबीसी विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार

मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ओबीसी कॅटेगरीमध्ये असणे खूप महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना धनगर समाजासाठी नाहीये. कारण मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही ऑल रेडी असल्यामुळे क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाहीये. त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी धनगर समाजाचे विद्यार्थी वगळले जातील. ओबीसी कॅटेगिरी मधील धनगर समाज वगळता सर्व समाजामधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 60 हजार रुपयांचा आर्थिक भत्ता हा शासनाद्वारे दिल्या जाणार आहे.

अनुदान वितरण

अनुदान वितरण
अनुदान वितरण

मूलभूत पात्रता

या योजनेसाठी विद्यार्थी वस्तीग्रह/होस्टेल प्रवेशासाठी पात्र असावा

  • विद्यार्थी महाराष्ट्रातलाच पाहिजे
  • या योजनेसाठी जातीचा दाखला सुद्धा महत्त्वाचा आहे
  • अनाथ मुलांसाठी अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे
  • दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे
  • विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा कमी असावी
  • या योजनेसाठी विद्यार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँक खात असावे
  • विद्यार्थी जेथे उच्च शिक्षण घेत आहे ती शैक्षणिक संस्था शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असावी.

शैक्षणिक पात्रता

  • ही योजना त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी 12वी नंतर उच्च शिक्षण घेत आहेत
  • या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 60 टक्के मार्क असणे गरजेचे आहे
  • या योजनेमध्ये 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि 30 टक्के जागा या बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवले जाते
  • जे काही विद्यार्थी पात्र असतील त्यांना या योजनेचा फायदा शिक्षण होईपर्यंत मिळेल
  • विद्यार्थी हा भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा पश्चिम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त विद्यालयात शिक्षण घेत असावा
  • या त योजनेचा लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये कमीत कमी 75 टक्के उपस्थिती असावी \
  • या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना फक्त पाच वर्षापर्यंत देण्यात येईल
  • तसेच या योजनेत पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 30 पेक्षा जास्त नसावे
  • आवश्यक कागदपत्रे
  • भाडेपत्र व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी असावी)
  • स्वयंघोष प्रमाणपत्र
  • कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  • आदमीरात असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करार पत्र
  • महाविद्यालयाचा बोनाफाईड किंवा इतर पुरावे

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वरील सर्व गोष्टी मध्ये तुम्ही पात्र आहात का नाहीत हे पाहणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे घेऊन इतर मागास बहुजन कल्याण जे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते येथे जाणे गरजेचे आहे. सर्व प्रादेशिक उपसंचालक हे त्यांच्या अधिनस्त प्रादेशिक विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक यांच्या साह्याने सदर योजनेचा मासिक आढावा घेतील. म्हणजे तुमच्याकडून ते अर्ज वगैरे भरून देतील लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ‘इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे’ जायचं आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana

मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन योजना, 100% अनुदान, लवकर करा अर्ज, Free Silai Machine Yojana 2024

Leave a comment