Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत हे तर तुम्हाला माहित असेलच. परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे माहीत नसेल की महाराष्ट्रामध्ये सध्या 80 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 18% ते 20% टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे आणि उर्वरित सर्व कापूस व्यापाऱ्यांकडे स्टॉप च्या माध्यमात आहे. शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव पुन्हा वाढणार का? हे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना सध्या पडत आहेत. कापसाचे भाव हे पुढील काळामध्ये कसे राहतील? एप्रिल मे महिन्यापर्यंत कापसाचे भाव वाढतील का? आणि सध्या कापसाचे दर काय सुरू आहेत? याबद्दल आपण सर्व काही चर्चा करणार आहोत. तरी शेतकरी मित्रांना तुम्हाला माहित असेल की परभणी आणि देऊळगाव राजा येथील बाजार समितीनी 8000 हजार प्रतिक्विंटल रुपयाचा आकडा पार केला आहे तर चला मग जाणून घेऊया पूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे बाजार भाव.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या कापसाला महाराष्ट्र मध्ये सरासरी दर हा 7500 रुपये प्रतिक्विंटल ते 7800 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आनंदात आहेत. तर कापसाला जास्तीत जास्त दर हा काही बाजार समितीमध्ये 8200 रुपये मिळत आहे. तर चला मग काल कापसाला किती भाव लागला ते सर्व आपण खालच्या टेबल मध्ये दिले आहे, ते तुम्ही सर्व वाचून घ्यावे आणि त्यानंतर आपला कापूस कुठे विकायचा आहे याबद्दल विचार करावा. तरी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 3 बाजार समिती अशा आहेत जेथे कापसाला सर्वोच्च भाव लागतात. त्या बाजार समितीमध्ये परभणी, अकोट आणि देऊळगाव राजा, शेतकरी मित्रांनो येथील बाजार समितीमध्ये मागच्या दोन हप्त्यापासून कापसाला 8000 हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे. त्यामुळे होईल जेवढे या तीन बाजार समितीमध्ये तुम्ही तुमचा कापूस विकण्याचा प्रयत्न करावा.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.10/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढणार?, Kapus Bajar Bhav Today
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7500 रु. |
भद्रावती | 7500 रु. |
मारेगाव | 7600 रु. |
अकोला | 7800 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8000 रु. |
उमरेड | 7510 रु. |
देऊळगाव राजा | 8025 रु. |
मांढळ | 7100 रु. |
यावल | 7180 रु. |
फुलंब्री | 7000 रु. |
अकोट | 8280 रु. |
पारशिवनी | 7125 रु. |
परभणी | 8000 रु. |
मानवत | 7980 रु. |
Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव हे वाढले आहे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरती कापसाचे दर हे 5 टक्के वाढले होते. त्यामुळेच महाराष्ट्रातील दरामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळाला होता. 8 मार्च रोजी कापसाचे दर हे चक्क 8200 रुपये प्रतिक्विंटल वरती गेली होत. सध्या शासनाने कापसाला 7020 रुपये एवढा हमीभाव दिला आहे. या हमीभावामुळे शेतकरी नाराज आहे. परंतु बाजार समितीमधील व्यापाऱ्यांची चांगला कापूस विकत घेण्यासाठी धडपड चालू आहे. कारण व्यापाऱ्यांना माहित आहे की पुढील काळामध्ये कापसाला चांगलेच दर होणार आहेत. पुढील काळामध्ये कापसाचे दर हे अचानक 9000 रुपये प्रतिक्विंटर वरती जाऊ शकतात असे काही अंदाज कापूस तज्ञांनी दिली आहे. त्यामुळे व्यापारी लोक हा कापूस विकत घेण्यासाठी जास्त धडपड करीत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा कापसाच्या दरवाढीची वाट पहावी आणि त्यानंतरच कापूस विकावा.
परभणी दुष्काळ यादी 2023, परभणीसाठी 206 कोटी मंजूर, शेतकऱ्यांची यादी पहा, Parbhani Dushkal Yadi 2023
दुष्काळ यादी 2023, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, यादी पहा, Dushkal Yadi 2023
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today”