Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव सध्या जास्तीत जास्त 8200 रुपये प्रति क्विंटल वरती गेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुन्हा श्वासात स्वाद घेतलेला आहे. मागील हप्त्यामध्ये कापसाचे भाव पुन्हा कमी झाली होती आणि आज कापसाचे भाव पुन्हा वाढले आहे. केंद्र शासनाने कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव दिलेला आहे. बाजार समितीमधील व्यापारी लोक हमीभावापेक्षा जास्त भावाने कापूस विकत घेत आहेत आणि याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेल आहे. तर चला पाहूया कोणत्या समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त हमीभाव भेटला आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.14/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today
आजचे कापसाचे बाजार भाव
सध्या राज्यामध्ये कापसाचा दर हा 8200 रुपये प्रतिक्विंटल वरती गेला आहे आणि बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाला 8000 रुपये जास्तीत जास्त दर भेटत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की संपूर्ण राज्यांमध्ये फक्त 4 बाजार समिती अशा आहेत, ज्यामध्ये कापसाला दाबून भाव मिळतो. त्या बाजार समिती तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम देऊळगाव राजा येथे सध्या कापसाला प्रतिक्विंटल दर हा 8200 रुपये एवढा आहे. त्यानंतर अकोला बोरगावमंजू येथे कापसाला जास्तीत जास्त दर 8000 रुपये मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा कापसाच्या दरवाढीत अग्रगण्य आहे तो म्हणजे परभणी जिल्हा सध्या परभणी जिल्ह्यामध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 8020 रुपये आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत बाजार समितीमध्ये कापसाला दर हा 7980 रुपये मिळत आहे.
बाजार समिती | जास्तीत जास्त |
अमरावती | 7500 रु. |
मारेगाव | 7500 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8000 रु. |
उमरेड | 7400 रु. |
देऊळगाव राजा | 8200 रु. |
वारोरा माढेली | 7600 रु. |
काटोल | 7300 रु. |
परभणी | 8020 रु. |
सिंधी(सेलू) | 7825 रु. |
मानवत | 7980 रु. |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीपासून कापूस घरामध्ये थप्पी लावून ठेवला होता आणि यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये जसे भाव वाढले की लगेच शेतकऱ्यांनी आपला कापूस विकायला काढला आणि असे मिळून राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. आता फक्त 20 ते 25 टक्के कापूस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे बरेच कापूस अभ्यासकांचा असा अंदाज आहे की येत्या 50 दिवसांमध्ये कापसाचे भावात पुन्हा दरवाढ व्हायची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसाचे भाव मध्ये 10% वाढ झाली होती आणि येत्या 50 दिवसांमध्ये कापसाच्या भावात पुन्हा 5% वाढ होणार आहे. केंद्र शासनाच्या हमीभावापेक्षाही सध्या राज्यात बाजार समितीतील व्यापारी लोक जास्त दराने कापूस विकत घेत आहेत. याचा तुम्ही अंदाज लावा की येथे काही दिवसांमध्ये पुन्हा कापसाचे दर वाढणार आहेत.
दुष्काळ यादी 2023, 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे, यादी पहा, Dushkal Yadi 2023
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.08/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Kapus Bajar Bhav Today”