Orchard Plantation Scheme 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील फळ पिकांची वाढ होणे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न मिळवून देणे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रवर्गातील 30 टक्के शेती करणाऱ्या स्त्रियांसाठी ही योजना राखीव ठेवणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळते. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये डाळिंब, आंबा, पेरू, सिताफळ, आवळा, जांभूळ, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी, अंजीर, नारळ इत्यादी फळ पिकांचे उत्पन्न घेऊन अनुदानास पात्र होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला दुर्लक्ष करू नये. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपली आर्थिक स्थिती वाढवण्यास भर घालावी. तर चला या योजनेअंतर्गत नवीन जीआर आलाय तो पाहून घेऊया.
फळबाग लागवड योजना 2024
मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकरी कोणत्याही फळपिकांचे उत्पन्न आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो. या योजनेत पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे 5 एकर पेक्षा कमी जमीन असली पाहिजे, त्याचबरोबर शेतकरी हा अनुसूचित जातीचा असला तर चांगलीच गोष्ट, सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थ्यामधील 30 टक्के शेती करणाऱ्या स्त्रियांसाठी ही योजना राखीव ठेवल्या जाते आणि या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के एवढ अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मोठा फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो 20 जानेवारी 2023 रोजी या योजनेसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा अनुदान मंजूर केलं होतं आणि आता शासनाने एक नवीन जीआर जाहीर केलेला आहे यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत एक नवीन निधी मंजूर केला आहे त्याबद्दल बोलूया,
फळबाग लागवड योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक नवीन योजना सुरू केली त्या योजनाचे नाव म्हणजे भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना. मित्रांनो या योजनेअंतर्गत वित्त विभागाच्या परिपत्रकास अनुलक्षण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी 2023 व 2024 करिता 10450.00 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत मागील वर्षांमधील काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अनुदान नाही मिळाले. अशा शेतकऱ्यांना आता जे काही थकीत अनुदान होतं ते अनुदान मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 04 मार्च 2024 रोजी एक नवीन जीआर जाहीर केला त्यामध्ये राज्यात भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2023-2024 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
फळबाग लागवड योजना 2024 अर्ज प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांना नव्याने 2024 या नवीन वर्षामध्ये फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करायचा असेल. अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी कृषी आयुक्त कार्यालयाकडून एप्रिल महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये कोणत्याही मराठी पेपर मध्ये फळबाग लागवड योजनेची एक जाहिरात येते, त्यामध्ये इच्छुक शेतकऱ्यांची ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जातात. जाहिरात आल्यानंतर अर्ज भरण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी दिलेला असतो आणि एकदा लाभार्थी या योजने करिता पात्र ठरला त्यानंतर पुढील 75 दिवसांच्या आत फळबाग लागवड सुरू होते.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
2 thoughts on “फळबाग लागवड योजना 2024, फळबाग लागवडीसाठी 3 वर्ष 50% अनुदान, नवीन जीआर पहा, Orchard Plantation Scheme 2024”