Kapus Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज कापसाला किती दर मिळाला. तर मित्रांनो सध्या कापसाचे दर हे मंदावली आहेत. मागील पंधरा दिवसाबाबत बोलले जाव तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्ता पासून कापसाची भाव अचानक वाढले होते. कापसाच्या भावामध्ये 10% दरवाढीमुळे जवळपास शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्यास काढला होता. याच शर्यतीमध्ये 75 टक्के शेतकऱ्यांनी आपलं कापूस विकायला काढला आणि विकून टाकला. आता फक्त 25 टक्के ते 20 टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे आणि त्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये सरासरी कापसाला दर हा 7300 रुपये ते 7500 रुपये एवढा मिळत आहे. तर चला आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे कापसाचे भाव पाहूया.
आजचे कापसाचे बाजार भाव
दि.06/03/2024 कापूस दराबद्दल बोललं जावं तर, आज कापसामध्ये एवढी मंदाई पाहायला नाही मिळाली. तरी पण कापसाला सरासरी दर 7300 रुपये ते 7600 रुपये प्रतिक्विंटल एवढा बघायला मिळाला आणि परभणी येथील मानवत बाजार समिती ने तर कमालच केली येथे कापसाला चक्क 8000 रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे आणि अकोट बाजार समिती सुद्धा 8000 हजार रुपयापर्यंत मिळत आहे. तर चला आपण पाहूया संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीमध्ये कापसाला 6 मार्च या रोजी किती दर लागला. खाली दिलेल्या टेबल नुसार जिल्हे नुसार बाजार समित्या आणि जास्तीत जास्त दर दाखवली आहे. ते तुम्ही स्पष्ट वाचून घ्यावे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7350 रु. |
राळेगाव | 7500 रु. |
भद्रावती | 7350 रु. |
मारेगाव | 7400 रु. |
पारशिवनी | 7125 रु. |
अकोला | 7800 रु. |
अकोट | 7980 रु. |
अकोला(बोरगावमंजू) | 7880 रु. |
उमरेड | 7320 रु. |
देऊळगाव राजा | 7850 रु. |
वारोरा-माढेली | 7400 रु. |
काटोल | 7150 रु. |
हिंगणघाट | 7700 रु. |
वर्धा | 7550 रु. |
यावल | 7170 रु. |
सिंधी(सेलू) | 7620 रु. |
मानवत | 7890 रु. |
परभणी | 7750 रु. |
Kapus Bajar Bhav Today
आजच्या कापूस बाजार भाव बद्दल बोलले जावे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी हे समजून घ्या की मागच्या पंधरा दिवसांमध्ये कापसाला दर का वाढला होता? हा कापूस भाव सध्या मंदावला असून पुन्हा कधी कापसाच्या भावात दर वाढ होऊ शकते? तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी दुसऱ्या हप्ता नंतर कापूस भाव अचानक वाढला होता. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढले होते. भारतामध्ये उद्योगांना कापसाची गरज भासत होती. त्यामुळे मागच्या पंधरवड्यामध्ये मोठी मागणी कापसाला आली होती. त्यामुळे कापसामध्ये अचानक 10 टक्के दर वाढ झाली होती. सध्या कापसाला सरासरी भाव हा 7500 मिळत आहे. आता या कापूस भाव मध्ये पुन्हा कधी वाढ होईल याबद्दल बोलले जाव तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच कापूस तज्ञांनी त्यांच्या अभ्यासानुसार सांगितला आहे की एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा या कापूस गावात 5 टक्के दर वाढवू शकते. म्हणजे हा कापूस भाव 8500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana
PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.06/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Kapus Bajar Bhav Today”